प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा टीझर रिलीज; संजय दत्त साकारणार खलनायक, रिलीज डेटही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:26 IST2025-06-16T12:25:55+5:302025-06-16T12:26:14+5:30

प्रभासच्या आगामी 'द राजा साब' सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायक म्हणून दिसणार आहे

the raja saab teaser starring prabhas sanjay dutt malvika mohnan riddhi agerwal | प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा टीझर रिलीज; संजय दत्त साकारणार खलनायक, रिलीज डेटही जाहीर

प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा टीझर रिलीज; संजय दत्त साकारणार खलनायक, रिलीज डेटही जाहीर

'द राजा साब' सिनेमाची (the raja saab teaser) सर्वांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. या सिनेमात प्रभास प्रमुख भूमिकेत होता. प्रभासचे याआधीचे सिनेमे 'आदिपुरुष' आणि 'कल्की २८९८ एडी' हे इतके चालले नव्हते. त्यामुळे प्रभासच्या आगामी  'द राजा साब' सिनेमाकडून प्रेक्षकांना अपेक्षा होती. अशातच नुकतंच प्रभासच्या  'द राजा साब' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने लाइमलाइट लुटली आहे. संजय दत्त या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 'द राजा साब' सिनेमाचा ट्रेलर

प्रभासच्या आगामी  'द राजा साब' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये प्रभास हा शहरात राहणारा एक व्यक्ती दिसून येतो. अशातच प्रभास एका मुलीच्या प्रेमात पडतो. पुढे एक मोठा वाडा दिसतो. या वाड्यात संजय दत्त आक्रमक रुपात बघायला मिळतो. संजय दत्त आणि त्याच्या पुर्वजांचा या वाड्यामध्ये अनोखा इतिहास असतो. पुढे प्रभास या वाड्यात येऊन त्याची गाठ संजय दत्तशी पडते. या वाड्याचं नेमकं रहस्य काय? आणि त्याचं प्रभासशी काय कनेक्शन आहे, हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल.

कधी रिलीज होणार 'द राजा साब'?

 'द राजा साब' सिनेमाचा टीझर अल्पावधीत  चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रभासचा हा सिनेमा हॉरर रोमँटिक कॉमेडी असणार आहे. सिनेमात प्रभाससोबत मालविका मोहनन, रिद्धी कुमार, निधी अग्रवाल हे कलाकार दिसणार आहेत. 'बाहुबली' आणि 'सलार' या सुपरहिट सिनेमांचा नायक प्रभास  'द राजा साब' सिनेमातून काय कमाल करणार, यासाठी प्रेक्षकांना काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.  'द राजा साब' सिनेमा ५ डिसेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: the raja saab teaser starring prabhas sanjay dutt malvika mohnan riddhi agerwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.