असं काही याआधी पाहिलं नसेल! विक्रमच्या 'तंगलान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 09:04 IST2024-07-11T09:02:47+5:302024-07-11T09:04:20+5:30

'अपरिचित' फेम चियान विक्रमच्या 'तंगलान'चा ट्रेलर रिलीज झालाय. भन्नाट कथा आणि रोमांचक ट्रेलर पाहून अंगावर काटा येईल

thanglaan trailer release starring chiyaan vikram malvika mohnan | असं काही याआधी पाहिलं नसेल! विक्रमच्या 'तंगलान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

असं काही याआधी पाहिलं नसेल! विक्रमच्या 'तंगलान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

साऊथ सिनेमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असे विषय हाताळले जात आहेत ज्याची आपण कल्पना करु शकत नाही. असाच एक आगळावेगळा विषय सिनेमातून मांडण्यात येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'तंगलान'. चियान विक्रमच्या आगामी 'तंगलान' सिनेमाचा टीझर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. आता नुकतंच 'तंगलान' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. सोन्याचा शोध घेतलेली रक्तरंजित कहाणी सिनेमातून दिसणार आहे.

'तंगलान' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

'तंगलान' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वाळवंटयुक्त जंगल दिसतं. या ठिकाणी सर्व आदिवासी राहत असतात. चियान विक्रम त्यांचा म्होरक्या म्हणून समोर येतो. अशातच काही ब्रिटीश अधिकारी सोन्याचा शोध घेत या भागात प्रवेश करतात. सोन्यासाठी ते तिकडच्या आदिवासींना कामाला लावतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. डोंगर फोडून सोनं शोधतात. यात ब्रिटीशांचा सामना करण्यासाठी चियान विक्रम रौद्ररुप धारण करताना दिसते. याशिवाय सरप्राईज पॅकेज म्हणून आरतीच्या भूमिकेत मालविका मोहनन समोर येते. 

'तंगलान' कधी रिलीज होणार

'तंगलान'च्या ट्रेलरमध्ये ऑफिशियल रिलीज डेट तर दिसत नाहीय. परंतु हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमात दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन पा रणजीत यांनी केले आहे. त्याचबरोबर स्टुडिओ ग्रीनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती के.ई. ज्ञानवेल राजा यांनी केली आहे. यात पार्वती तिरुवोथु, पसुपती आणि डॅनियल कॅल्ट्रोगिन या कलाकारांच्याही भूमिका आहेत. या सिनेमात जीव्ही प्रकाश कुमार यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे.

Web Title: thanglaan trailer release starring chiyaan vikram malvika mohnan