थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर? अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंधामुळे मोडला २७ वर्षांचा संसार, पत्नीचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:09 IST2026-02-28T11:08:51+5:302026-02-28T11:09:10+5:30

लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नी संगीताने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

thalpathy vijay extra marital affair with actress actor wife allegations after filing divorce | थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर? अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंधामुळे मोडला २७ वर्षांचा संसार, पत्नीचे गंभीर आरोप

थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर? अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंधामुळे मोडला २७ वर्षांचा संसार, पत्नीचे गंभीर आरोप

साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. थलपति विजयचे अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांचा घटस्फोट होत असल्याचं समोर आलं आहे. पत्नी संगीताने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, थलपति विजयची पत्नी संगीता सोरनलिंगम हिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने थलपति विजयवर गंभीर आरोप केले आहेत. विजयचं एका अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मरेटियल अफेअर होते. २०२१मध्ये याबाबत संगीता यांना कळालं. त्यानंतर विजयने पत्नीला आश्वासन दिलं होतं की अभिनेत्रीसोबत असलेले सगळे संबंध तो तोडणार आहे. मात्र तसं काहीच घडलं नाही. त्यानंतरही त्यांचं अफेअर सुरुच राहिलं. त्यामुळे संगीताला भावनिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. याशिवाय थलपति विजय त्या अभिनेत्रीसोबत परदेशी फिरायलाही गेल्याचं म्हटलं गेलं आहे. 

संगीताने तिच्या याचिकेत असा दावा केला आहे की अभिनेत्री विजयसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करते. ज्यामुळे तिला आणि तिच्या मुलांना अनेकदा अपमानित व्हावं लागलं आहे. या याचिकेतून संगीताने विजयकडून मेंटनेंस आणि एलिमनी(पोटगी)ची मागणी केली आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. 

थलपति विजय आणि संगीता सोरनलिंगम यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी लग्न करत संसार थाटला होता. त्यांना २ मुलं आहेत. थलपति हा साऊथमधला सुपरस्टार आहे. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे सिनेसृष्टीला दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच थलपतिने अभिनयातून संन्यास घेतला आहे. आता तो राजकारणात सक्रिय झाला आहे. 

Web Title : थलपति विजय पर अफेयर का आरोप, 27 साल बाद तलाक की अर्जी।

Web Summary : थलपति विजय और उनकी पत्नी संगीता कथित तौर पर 27 साल बाद तलाक ले रहे हैं, क्योंकि उन पर एक अभिनेत्री के साथ संबंध का आरोप है। संगीता ने भावनात्मक संकट और बेवफाई का हवाला देते हुए याचिका दायर की है और गुजारा भत्ता मांगा है। विजय ने अभी तक आरोपों पर आधिकारिक तौर पर कोई जवाब नहीं दिया है।

Web Title : Thalapathy Vijay faces divorce amid affair allegations after 27 years.

Web Summary : Thalapathy Vijay and his wife Sangita are reportedly divorcing after 27 years due to his alleged affair with an actress. Sangita has filed a petition citing emotional distress and infidelity, seeking maintenance. Vijay has not yet officially responded to the allegations.