फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:58 IST2026-04-01T17:17:43+5:302026-04-01T18:58:32+5:30

जिथे बड्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत, तिथे एका ६३ वर्षांच्या अभिनेत्रीने चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे.

Thai Kizhavi Box Office Collection 80 Crore Radhika Sarathkumar Ott Release | फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?

फक्त ९ कोटींचा खर्च, ८० कोटींची कमाई! 'थाई किझवी' ओटीटीवर कुठे पाहायचा?

Radikaa Sarathkumar Thaai Kizhavi : चांगली कथा आणि दमदार अभिनय असेल, तर मोठ्या स्टारशिवायही चित्रपट सुपरहिट होऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार (Raadhika Sarathkumar) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला तमिळ विनोदी-नाट्यपट 'थाई किझावी' (Thai Kizhavi) सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात कोणताही मोठी स्टारकास्ट नसतानाही, राधिका यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ८० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून एक नवा इतिहास रचला आहे.

Sacnilk च्या माहितीनुसार,  फक्त ९ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने  जगभरातील बॉक्स ऑफिसवर ८० कोटींहून अधिक रुपयांची एकूण कमाई (Gross) केली आहे. राधिका सरथकुमार यांनी सांगितले की, जर या चित्रपटाचे तिकीट दर मोठ्या चित्रपटांसारखे १ हजार ते १ हजार ५०० रुपये असते, तर हा चित्रपट सहज १०० कोटींचा टप्पा पार करू शकला असता. मात्र, तिकीट दर सुमारे १५० रुपये असल्यामुळे प्रेक्षकांवर कोणताही आर्थिक ताण आला नाही. हा चित्रपट शिवकुमार मुरुगेसन  यांनी दिग्दर्शित केला असून शिवकार्तिकेयन यांच्यासह निर्मिती करण्यात आली आहे. 

काय आहे 'थाई किझावी' चित्रपटाची कथा?

२७ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा ७० वर्षांच्या श्रीमंत महिलेभोवती फिरते. राधिका सरथकुमार यांनी साकारलेली पावुनुथायी ही व्यक्तिरेखा आजारी अवस्थेत बिछान्यावर असते, तर तिचे तीन मुले संपत्तीसाठी भांडताना दिसतात. ही कथा प्रेक्षकांना खूप भावली आहे.

'थाई किझावी' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार?

अखेर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'थाई किझावी' आता १० एप्रिल २०२६ पासून जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.

Web Title : कम बजट, बड़ी कमाई! 'थाई किझावी' ओटीटी पर कब देखें?

Web Summary : राधिका सरथकुमार की 'थाई किझावी', जो 9 करोड़ रुपये के बजट में बनी, ने 80 करोड़ रुपये से अधिक की कमाई की। एक बूढ़ी महिला और उसके झगड़ालू बेटों की यह फिल्म 10 अप्रैल, 2026 से जियो हॉटस्टार पर स्ट्रीम होगी।

Web Title : Low budget, high returns! 'Thai Kizhavi' OTT release details.

Web Summary : Radhika Sarathkumar's 'Thai Kizhavi,' made on a ₹9 crore budget, grossed over ₹80 crore. The film, about an elderly woman and her squabbling sons, will stream on Jio Hotstar from April 10, 2026.