अविवाहित प्रेग्नंट मुलगी, गर्भपात करण्याआधीच झालं लॉकडाउन; ओटीटीवर आला 'हा' थ्रिलर सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:04 IST2026-03-11T16:03:37+5:302026-03-11T16:04:39+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

tamil movie lockdown ott release starring anupama parmeswaran story about unmarried pregnant girl | अविवाहित प्रेग्नंट मुलगी, गर्भपात करण्याआधीच झालं लॉकडाउन; ओटीटीवर आला 'हा' थ्रिलर सिनेमा

अविवाहित प्रेग्नंट मुलगी, गर्भपात करण्याआधीच झालं लॉकडाउन; ओटीटीवर आला 'हा' थ्रिलर सिनेमा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'प्रेमम' फेम अनुपमा परमेश्वरन सध्या तिच्या 'लॉकडाउन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जानेवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा थ्रिलर-ड्रामा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. लायका प्रॉडक्शन्सने बुधवारी, ११ मार्च रोजी अधिकृत घोषणा केली की, हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत पाहता येईल.

हा आहे 'लॉकडाउन' सिनेमा. हा मूळ तमिळ चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन ए.आर. जीवा यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपमा परमेश्वरन मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत चार्ली, निरोशा आणि लिविंगस्टन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले होते, त्यानंतर ३० जानेवारी २०२६ रोजी तो थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटाची कथा कोविड-१९ महामारीच्या काळात चेन्नई शहरात घडते. यात अनिता (अनुपमा) नावाच्या एका मध्यमवर्गीय तरुणीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अनिता एका सनातनी कुटुंबातील जबाबदार मुलगी आहे, मात्र लॉकडाऊनच्या काळात तिच्या आयुष्यात असे एक वळण येते की तिचे जगणे कठीण होते. या कठीण काळात तिला एका अशा गुपिताचा सामना करावा लागतो, जो तिला जगापासून लपवून ठेवायचा असतो, मात्र परिस्थितीमुळे ती एकाकी पडते.

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. अविवाहित असताना अनिताला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल समजते आणि लॉकडाऊनमुळे बाहेर जाणे अशक्य असल्याने तिला गर्भपातासाठी (Abortion) कोणत्या टोकाच्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचे वास्तववादी चित्रण यात केले आहे. एका तरुण अविवाहित स्त्रीचा मानसिक ताण, सामाजिक दडपण आणि एकाकी लढा यावर भाष्य करणारा हा एक भावनिक आणि अंगावर येणारा थरारपट आहे.

Web Title : अविवाहित, गर्भवती, लॉकडाउन: थ्रिलर फिल्म ओटीटी पर स्ट्रीम हुई।

Web Summary : अनुपमा परमेश्वरन की 'लॉकडाउन', कोविड-19 महामारी के दौरान एक गर्भवती महिला के बारे में एक थ्रिलर, अमेज़ॅन प्राइम पर स्ट्रीम होती है। फिल्म लॉकडाउन के दौरान गर्भपात कराने की कोशिश करते हुए सामाजिक दबाव और अलगाव के साथ उसके संघर्षों की पड़ताल करती है। सच्ची घटनाओं पर आधारित, यह उसकी भावनात्मक उथल-पुथल का एक यथार्थवादी चित्रण प्रस्तुत करता है।

Web Title : Unmarried, pregnant, locked down: Thriller movie streams on OTT.

Web Summary : Anupama Parameswaran's 'Lockdown', a thriller about a pregnant woman during the COVID-19 pandemic, streams on Amazon Prime. The film explores her struggles with societal pressure and isolation while seeking an abortion during lockdown. Based on true events, it offers a realistic portrayal of her emotional turmoil.