प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री व्हेंटिलेटरवर, अपघातात डोक्याला गंभीर दुखापत; बहिणीने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:56 IST2024-03-18T15:56:05+5:302024-03-18T15:56:23+5:30

अभिनेत्री अरुंधती अपघातात गंभीर जखमी, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बहिणीने दिली माहिती

tamil actress arundhati nair on ventilator support after bike accident sister shared post | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री व्हेंटिलेटरवर, अपघातात डोक्याला गंभीर दुखापत; बहिणीने दिली माहिती

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री व्हेंटिलेटरवर, अपघातात डोक्याला गंभीर दुखापत; बहिणीने दिली माहिती

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायरच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधतीचा अपघात झाला होता. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्रिवेंद्रम येथील अनंतापूरी या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याची माहिती अरुंधतीच्या बहिणीने दिली आहे. 

१४ मार्चला अरुंधतीच्या दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. याबाबत तिच्या बहिणीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. "तमिळनाडूतील वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेलद्वारे दिली गेलेली बातमी ही खरी आहे. माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला आहे," असं तिने म्हटलं आहे. या पोस्टद्वारे अरुंधतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन तिच्या बहिणीने चाहत्यांना केलं आहे. 

"या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तिच्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे," असंही पुढे अरुंधतीच्या बहिणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरुंधती अपघातावेळी तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती. एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिल्यानंतर घरी येताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. तिच्या अपघाताच्या बातमीनंतर चाहते चिंतेत आहेत. 

तमिळ आणि मल्याळम सिनेमात काम करून अरुंधतीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिने २०१४ साली पोंगी इझहू मनोहरा या तमिळ सिनेमातून पदार्पण केलं होतं. सैथान या सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमात ती दिसली होती. 

Web Title: tamil actress arundhati nair on ventilator support after bike accident sister shared post