काळजाचा उडेल थरकाप! सूर्या आणि बॉबी देओलच्या आगामी 'कंगुआ'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:31 IST2024-08-12T14:30:35+5:302024-08-12T14:31:12+5:30
रक्तरंजिता आणि भन्नाट कथानक असणारा सूर्या आणि बॉबी देओलच्या कंगुआचा ट्रेलर एकदा बघाच (suriya, kanguva, bobby deol)

काळजाचा उडेल थरकाप! सूर्या आणि बॉबी देओलच्या आगामी 'कंगुआ'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
गेल्या अनेक दिवसांपासून सूर्या आणि बॉबी देओलच्या आगामी 'कंगुआ' सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली. 'कंगुआ'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत बॉबी देओल आहे असं समजताच लोकांना आनंद निर्माण झाला. अखेर सूर्या आणि बॉबी देओलच्या आगामी 'कंगुआ'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये आजवर कधीही न पाहिलेलं भन्नाट जग पाहायला मिळतंय.
'कंगुआ'चा भन्नाट ट्रेलर रिलीज
काहीच मिनिटांपूर्वी सूर्या आणि बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या 'कंगुआ'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात दोन आदिवासी गटांमध्ये तुल्यबळ लढत बघायला मिळतंय. ट्रेलरच्या सुरुवातीलाच बॉबी देओलचा खूनशी लूक पाहायला मिळतो. पुढे घोड्यावर बसून रुबाबदार आणि आक्रमक शैलीत सूर्याची एन्ट्री झालेली दिसते. सूर्या आणि बॉबी देओलमध्ये जोरदार हाणामारी झालेली दिसते. पुढे समुद्रातील बोट, जंगलातला वणवा अशा अनेक भन्नाट गोष्टी सिनेमात बघायला मिळतात.
कंगुआ कधी रिलीज होणार?
सूर्याच्या फॅन्सनी 'कंगुआ'मधील त्याच्या लूकला चांगलीच पसंती दिली आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलनेही सर्वांना सरप्राईज करुन सोडलंय. शिवा यांनी 'कंगुआ'चं दिग्दर्शन केलं असून देवी प्रसाद यांनी संगीत दिलंय. सिनेमा 3D त पाहायला मिळणार असून जगभरातील ३८ भाषांमध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. 'कंगुआ' १० ऑक्टोबर २०२४ ला संपूर्ण भारतात रिलीज होतोय. ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही हे काहीच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.