कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:49 IST2025-12-17T17:48:20+5:302025-12-17T17:49:01+5:30
१४५ कोटी भारतीयांमधून एस.एस. राजामौली ठरले 'अवतार: फायर अँड ॲश'' पाहणारे पहिले व्यक्ती.

कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
SS Rajamouli's review of Avatar: Fire and Ash : हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड ऍश' हा चित्रपट १९ डिसेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी तो पाहिला आहे. भारतातील १४५ कोटी लोकांपैकी 'अवतार: फायर अँड एश' पाहणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. 'अवतार: फायर अँड ऍश' पाहिल्यानंतर राजामौली यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
राजामौली यांनी केवळ हा चित्रपट पाहिलाच नाही, तर खुद्द जेम्स कॅमेरॉन यांच्याशी व्हर्च्युअल संवाद साधून त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "१४५ कोटी भारतीयांमध्ये हा चित्रपट पाहणारा मी पहिला व्यक्ती ठरलो, याचा मला अभिमान वाटतो. हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. जेव्हा मी 'फायर अँड ॲश' पाहिला, तेव्हा मला पुन्हा एकदा थिएटरमध्ये बसलेल्या लहान मुलासारखं वाटलं. डोळ्यांचे पारणे फेडणारे व्हिज्युअल्स पाहून मी भारावून गेलो आहे".
संपूर्ण चित्रपटाबद्दल बोलताना राजामौली यांनी जेक सुली हे आपलं आवडतं पात्र असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, " मी थिएटरमधून बाहेर आलो होतो, पण चित्रपट माझ्या डोक्यातून जात नव्हता. पहिल्या अवतारातील जेक सुलीची मूल्ये जितकी मजबूत होती, त्यापेक्षाही अधिक प्रगल्भ आणि वेदनादायी प्रवास या तिसऱ्या भागात पाहायला मिळाला".

राजामौली पुढे म्हणाले, "या चित्रपटात दोन अतिशय सुंदर संघर्ष दाखवले आहेत. पहिला माइल्स आणि जेक यांच्यातला आणि दुसरा नेत्री आणि वरांग यांच्यातला. पहिल्या अवतारमध्ये मला माइल्स अजिबात आवडला नव्हता, पण 'अवतार: फायर अँड ऍश' मध्ये मी त्याचा तिरस्कार करायचा प्रयत्न करतोय, पण ते जमत नाही. माइल्स आणि जेक यांच्यातील संवाद अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेले असून, त्यात खूप वेदना दडलेल्या आहेत".
दरम्यान, 'अवतार' ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट फ्रँचायझी आहे. पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. तिसरा भाग १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.