२०० नाही, ५०० नाही तर राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट आहे 'इतके' कोटी, ठरलाय महागडा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:13 IST2025-11-18T16:09:32+5:302025-11-18T16:13:04+5:30
'वाराणसी' सिनेमाच्या बजेटचा आकडा समोर आला आहे. तो वाचून तुम्ही थक्कच व्हाल.

२०० नाही, ५०० नाही तर राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट आहे 'इतके' कोटी, ठरलाय महागडा सिनेमा
'बाहुबली' (Baahubali) आणि 'आरआरआर' (RRR) सारखे भव्य आणि रेकॉर्डब्रेक चित्रपट देणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या पुढील सर्वात मोठ्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत. हा प्रोजेक्ट आहे अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टारर चित्रपट 'वाराणसी'. या सिनेमाचा भव्यदिव्य प्रमोशनल इव्हेंट काहीच दिवसांपूर्वी पार पडला. 'बाहुबली' आणि 'आरआरआर' पेक्षाही 'वाराणसी'चं बजेट तगडं असल्याचं दिसतंय.
किती कोटींचा चित्रपट आहे 'वाराणसी'?
राजामौली यांनी ज्या पद्धतीने या चित्रपटाचा ग्रँड लॉन्च इव्हेंट आयोजित केला, तो पाहून भारतीय सिनेमा एका नवीन स्तरावर पोहोचल्याचे बोलले जात आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, या चित्रपटाच्या बजेटबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राजामौली यांचा हा चित्रपट सुमारे १००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असल्याची चर्चा होती.
पण आता मीडिया रिपोर्टनुसार 'वाराणसी' बजेट हे खरंच १००० कोटींच्या आसपास आहे. या सिनेमात पौराणिक काळापासून सध्याचा आधुनिक काळ दिसणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देईल यात शंका नाही. त्यामुळेच 'वाराणसी'चं बजेट १००० कोटी असल्याचं बोललं जातंय.
'वाराणसी'चे खरे बजेट किती?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या १००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा खर्च, म्हणजेच प्रिंटिंग आणि पब्लिसिटीचा खर्च समाविष्ट नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत हे बजेट १४०० ते १५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या अंतिम प्रदर्शनानंतरच या अचूक बजेटची माहिती समोर येईल.
एस.एस. राजामौली त्यांच्या चित्रपटांच्या भव्य दृष्टीकोनासाठी ओळखले जातात. एकीकडे रणबीर कपूरचा 'रामायण' ४००० कोटींच्या बजेटमध्ये बनत असताना, राजामौली त्यांच्या चित्रपटासाठी एवढा मोठा दृष्टीकोन कमी बजेटमध्ये साकारत आहेत, हे विशेष आहे. 'वाराणसी' हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.