पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना दिसले एस एस राजामौली, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 20:30 IST2024-04-01T20:30:00+5:302024-04-01T20:30:02+5:30
एका लग्नसमारंभातील हा कथित व्हिडिओ आहे. राजामौली आपली पत्नी रमासोबत एका लग्नसमारंभासाठी आले आहेत.

पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना दिसले एस एस राजामौली, Video व्हायरल
'बाहुबली', RRR सारखे मास्टरपीस चित्रपट देणारे दिग्दर्शक, निर्माते एस एस राजामौली ( S S Rajamouli) यांचा शांत स्वभाव नेहमीच दिसून आला आहे. चेहऱ्यावर मृदू हास्य, सर्वांशी आदराने बोलणारे राजमौली भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिभाशाली दिग्दर्शक आहेत. पण सध्या राजामौलींचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. नेहमी शांत दिसणारे राजमौली चक्क पत्नीसोबत डान्स करण्याचा आनंद घेत आहेच. स्टेजवर पत्नीसोबत एका गाण्यावर थिरकतानाचा त्यांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही त्यांची वेगळी बाजू दिसून आली आहे.
एका लग्नसमारंभातील हा कथित व्हिडिओ आहे. राजामौली आपली पत्नी रमासोबत एका लग्नसमारंभासाठी आले आहेत. ए आर रहमान यांच्या एका लोकप्रिय गाण्यावर राजामौलींनी स्टेजवर ठेका धरला आहे. 'प्रेमीकुडू' सिनेमातील 'अंदामैना प्रेमरानी' या गाण्यावर राजामौली नाचत आहेत. त्यांना पत्नीनेही उत्तम साथ दिली आहे. त्यांचा हा रोमँटिक अंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. दोघंही एकमेकांचा हाथ धरत डान्स करत आहेत तर समोर असलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत त्यांचा उत्साह वाढवत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते तर खूपच प्रभावित झाले आहेत.
Director @SSRajamouli and his wife groove to the beats of Beautiful melody pic.twitter.com/ib5RjAQVxy
— Suresh PRO (@SureshPRO_) March 31, 2024
राजामौली यांनी २००१ साली रमा यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत. रमा स्वत: कॉस्च्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट आहेत. राजामौली यांच्या सिनेमांसाठी त्याच कॉस्च्युम डिझायनरचं काम करतात. त्यांना तीन वेळा बेस्ट कॉस्च्युम डिझायनरचा अवॉर्डही मिळाला आहे. 'मगाधिरा','ईगा','बाहुबली',बाहुबली 2','आरआरआर' या सिनेमांसाठी त्यांनी काम केले आहे.