ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:18 IST2025-04-29T10:17:18+5:302025-04-29T10:18:00+5:30
ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्माते खुलासा करत म्हणाले...

ब्लॉकबस्टर 'बाहुबली' सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले...
Bhahubali Movie Re-Release: जगभरात लोकप्रिय ठरलेल्या 'बाहुबली' या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. बाहुबली या चित्रपटाने त्यातील कलाकार फक्त भारतातच नाहीतर जगभरात लोकप्रिय झाले. या चित्रपटातील प्रभासच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या चित्रपटामुळे त्याचा चाहतावर्गही प्रचंड वाढला. त्यात आता या बाहुबली-द बिगनिंग चित्रपटासंदर्भात निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. जवळपास १० वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
And on this special day, I am thrilled to inform you all that we are planning an Indian and international re-release of @BaahubaliMovie in October this year. It won't just be a re-release, it will be a year of celebration for our beloved fans! Expect nostalgia, new reveals, and… https://t.co/9q5e2haQ6r
— Shobu Yarlagadda (@Shobu_) April 28, 2025
'बाहुबली' सिनेमाचे निर्माता शोबू यारलागड्डा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली. त्यांनी लिहिले की, "तुम्हाला सगळ्यांना ही माहिती देताना मला आनंद होत आहे की या वर्षी आम्ही बाहुबली चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची योजना आखत आहोत. हा चित्रपट पुन्हा एकदा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फक्त पुन्हा रिलीज होणार नाही तर आमच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी असेल. या काळात जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्याची संधी मिळेल." अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
दरम्यान, एस एस राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते जे तुफान गाजले. बाहुबली या सिनेमाने जगभरातून १००० हून अधिक कोटींची कमाई केली होती. 'बाहुबली: द बिगिनिंग' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता, तर त्याचा दुसरा भाग 'बाहुबली २: द कन्क्लुजन' २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १० वर्षे उलटून गेली आहेत आणि या खास प्रसंगी निर्मात्यांनी 'बाहुबली' पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या निर्णय त्यांनी घेतला आहे. प्रभासचा हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.