साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन झाला मुंबईकर, बांद्रामध्ये खरेदी केला आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 11:14 IST2024-09-17T11:13:31+5:302024-09-17T11:14:19+5:30

फ्लॅटची किंमत ऐकून उडेल झोप, स्टॅम्प ड्युटीही कोटींच्या घरात

South superstar Prithviraj Sukumaran bought a luxurious duplex flat in pali hill mumbai | साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन झाला मुंबईकर, बांद्रामध्ये खरेदी केला आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट

साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन झाला मुंबईकर, बांद्रामध्ये खरेदी केला आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट

साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) आता मुंबईकर झाला आहे. त्याने मुंबईतील पाली या उच्चभ्रू वसाहतीत आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे. शिवाय स्टॅम्प ड्युटीही मोठी आहे. पृथ्वीराजचं प्रोडक्शन हाऊस 'पृथ्वीराज प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड' त्या नावावर फ्लॅट घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्याच्या पत्नीच्या नावाने याच भागात आणखी एक कोट्यवधींचा फ्लॅट आहे.

रिपोर्टनुसार, पृथ्वीराज सुकुमारनचा लक्झरी फ्लॅट पाली हिल येथील 'नारायण टेरेस' मध्ये आहे. ही रेडी टू मूव्ह हाऊसिंग सोसायटी  आहे. याठिकाणी ३, ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट्स आहेत. पृथ्वीराजने ड्युप्लेक्स खरेदी केला आहे ज्याचा २९७१ चौरस फुट एरिया आहे. याच महिन्यात अभिनेत्याने फ्लॅटची डील केली. अभिनेत्याने यासाठी १.८४ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तसंच ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस दिली आहे. फ्लॅटची एकूण किंमत तब्बल ३०.६ कोटी रुपये आहे.


मुंबईचा बांद्रा येथील पाली हिल भागात अनेक श्रीमंत लोकांचं वास्तव्य आहे. नुकतंच तृप्ती डिमरीनेही इथेच फ्लॅट खरेदी केला. शिवाय रणवीर सिंह, अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांची देखील याच भागात प्रॉपर्टी आहे. पृथ्वीराजने फ्लॅटच नाही तर याचवर्षी जून महिन्यात ३ कोटींची पोर्शे कारही खरेदी केली होती. त्याच्याजवळ आणखीही शानदार काही शानदार कार कलेक्शन आहे. 

पृथ्वीराज सुकुमारन सध्या 'एल2: एम्पुरान' सिनेमाचं शूट करत आहे. याआधी तो 'सालार पार्ट १ सीजफायर','द गोट लाइफ' आणि एका मल्याळम सिनेमातही दिसला. 

Web Title: South superstar Prithviraj Sukumaran bought a luxurious duplex flat in pali hill mumbai