साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर दु:खाचा डोंगर, बहीण नागा सरोजा यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:55 IST2023-10-19T09:54:08+5:302023-10-19T09:55:24+5:30

नागा सरोजा ही नागार्जुन यांची तिसरी मोठी बहिण होती.

South superstar Nagarjuna s sister Naga Saroja passed away on tuesday actor is in shock | साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर दु:खाचा डोंगर, बहीण नागा सरोजा यांचं निधन

साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर दु:खाचा डोंगर, बहीण नागा सरोजा यांचं निधन

साऊथ सुपस्टार अक्किनेनी नागार्जुनवर (Akkineni Nagarjuna) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची बहीण नागा सरोजा यांचं निधन झालं आहे. अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. १७ ऑक्टोबर रोजी मंगळवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यामुळे नागार्जुनच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

नागा सरोजा ही नागार्जुन यांची तिसरी मोठी बहिण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांची पाच मुलं होती. दोन मुलं आणि तीन मुली असा समावेश होता त्यात नागा सरोजा तिसरी होती. सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा आणि वेंकट आणि नागार्जुन अशी पाचही मुलांची नावं आहेत. अभिनेते नागार्जुन सर्वात लहान आहेत.

नागा सरोजा यांच्याल निधनाने लहान भाऊ नागार्जुन यांना मोठा धक्का बसला आहे. काल नागा सरोजा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यानंतर नागार्जुन यांची अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी भेट घेत त्यांना धीर दिला. 

नागेश्वर राव यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अक्किनेनी कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीत दबदबा आहे. नागेश्वर राव यांचा फिल्म वारसा छोटा मुलगा नागार्जुन यांनी सुरु ठेवला. नागार्जुन यांची मुलं नागा चैतन्य. अखिल हे देखील फिल्म इंडस्ट्रीत आले. नागार्जुन यांचा भाऊ वेंकटही निर्माते आहेत. नागा सरोजा मात्र प्रसिद्धीपासून दूर होत्या. त्यांना कोणत्याच कार्यक्रमातही बघितलं गेलं नाही. त्या केवळ कौटुंबिक सोहळ्यात दिसायच्या.

Web Title: South superstar Nagarjuna s sister Naga Saroja passed away on tuesday actor is in shock