भर गर्दीत चाहत्याने हात ब्लेडने कापला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपबीती, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:28 IST2025-11-03T10:25:58+5:302025-11-03T10:28:25+5:30
चाहत्याने हातावर ब्लेडने वार केले अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला तो थरारक प्रसंग

भर गर्दीत चाहत्याने हात ब्लेडने कापला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपबीती, काय घडलेलं?
Ajith Kumar: दक्षिणेत चित्रपटाचं प्रचंड वेड असून आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात.दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. आपल्या आवडत्या नायकांची पूजा करण्यापासून ते अगदी त्यांच्यासाठी जीव देण्याचीही तयारी या चाहत्यांची असते. तर काही चाहते असे असतात जे त्यांच्या आवडत्या स्टार्ससाठी कोणत्याही थराला जातात.असाच काहीसा प्रकार अभिनेता अजितसोहत घडला होता. अलिकडेच एका मुलाखतीत त्याने हा किस्सा शेअर केला.
नुकतीच साऊथ स्टार अजित कुमारने 'हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत, अजितने चाहत्यांना भेटणं हे कधीतरी जीवावर बेतू शकतं असं म्हटलं. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने एका घटनेचा उल्लेख करत सविस्तर सांगितलं, जेव्हा एका चाहत्याने त्याला भेटल्यावर अभिनेत्याच्या हातावर ब्लेडने वार केले होते. ही घटना साधारण २००५ साली घडली होती.
गर्दीत एका चाहत्याने हात ब्लेडने कापला अन्...
असे खूप चाहते असतात त्यांना तुम्हाला जवळून बघायचं असतं,स्पर्श करायचा असतो.एक कलाकार म्हणून तुम्हाला असे कित्येक चांगले-वाईट अनुभव तुम्हाला येत असतात.म्हणून मी गाडीमध्ये बसलो असताना बरेचसे लोक हास्तोंदलन करण्यासाठी पुढे येतात,असं अनेकदा होतं. पण, २००५ साली माझ्यासोबत विचित्र घटना घडली होती. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे दररोज गर्दी वाढत होती. हॉटेल मालकाने विचारले, "अजित, शूटिंगला जाताना किंवा येताना तू थोडा वेळ काढावा अशी आमची इच्छा आहे? आम्हाला गर्दी सांभाळणे कठीण जात आहे. तुम्ही त्यांच्यासोबत काही फोटो काढू शकता का?"
पुढे अजितने म्हटलं तो अनेकदा चाहत्यांना प्रेमाने, आदरपूर्वक भेटतो. पण, अनेकदा त्यांना भेटताना, तो धोकादायक परिस्थितीत सापडला आहे. त्यानंतर त्या घटनेचा संदर्भ देत अजित म्हणाला,"एके दिवशी, खूप लोक हस्तोंदलन करण्यासाठी पुढे येत होते.पण, त्यावेळी मला काही कळायच्या आतच गोंधळ उडाला.एका सुरक्षारक्षकाने १८ किंवा १९ वर्षांच्या एका मुलाला पकडलं.त्या मुलाने एक ब्लेड हातात अर्ध मोडलं होतं आणि ते त्याच्या हातात पकडून उभा होता. कोणीतरी ते पाहिलं आणि त्याचा हात धरला. तो मुलगा शुद्धीत नव्हता. त्याने मद्यपान केलं होतं की काय ते आम्हाला कळलं नाही.पण, त्याचा हेतू चांगला नव्हता. यापुढे अभिनेता म्हणाला की, कधीकधी खरे चाहते कोण आहेत आणि धोका निर्माण करू शकणारे लोक कोण आहेत? हे समजणं कठीण जातं.