अनंत-राधिकाच्या वेडिंगची चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:01 IST2024-07-12T16:01:01+5:302024-07-12T16:01:45+5:30

अनंत-राधिकाच्या लग्नाच्या धामधूमीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

south indian actress Varalaxmi Sarathkumar tied knot with business man nikolai sachdev see wedding photos | अनंत-राधिकाच्या वेडिंगची चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

अनंत-राधिकाच्या वेडिंगची चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या सर्वत्र जिकडेतिकडे अनंत-राधिकाच्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या धामधूमीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार विवाहबंधनात अडकली आहे. वरलक्ष्मीने व्यावसायिक निकोलाई सचदेव यांच्याबरोबर सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. वरलक्ष्मी आणि सचदेव यांनी थायलंडमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह केला. दाक्षिणात्य पद्धतीने वरलक्ष्मी आणि सचदेव लग्नाच्या बेडीत अडकले. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडला. 

वरलक्ष्मी आणि सचदेव यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत. आयुष्यातील या खास क्षणासाठी वरलक्ष्मी आणि सचदेव यांनी पारंपरिक पोशाखाला पसंती दिली. लाल रंगाची साडी आणि पारंपरिक दागिने घालत वरलक्ष्मी नटली होती. तर सचदेव यांनी लुंगी नेसून पारंपरिक लूक केला होता. थायलंडमधील एका बीचवर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर रिसेप्शनही ठेवण्यात आलं होतं. 

Web Title: south indian actress Varalaxmi Sarathkumar tied knot with business man nikolai sachdev see wedding photos