अभिनेत्री ज्योतिकाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:59 IST2025-12-04T18:59:27+5:302025-12-04T18:59:43+5:30
ज्योतिकानं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतले.

अभिनेत्री ज्योतिकाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक
दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका तिच्या अभिनयासह, निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते. ज्योतिका हे नाव साऊथ इंडस्ट्रीत चांगलंच लोकप्रिय आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या ज्योतिकाने काही बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे. नुकतंच ज्योतिकानं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतले.
साई दर्शनानंतर संस्थानच्यावतीनं ज्योतिकाचा शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरातही जाऊन ज्योतिकानं मनोभावे दर्शन घेतलं आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईदर्शनानंतर ज्योतिका म्हणाली, "आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला शांतता वाटली. जेव्हा-जेव्हा साई चरणी नतमस्तक झाले आहे, तेव्हा प्रत्येक इच्छा पुर्ण झाली आहे".
ज्योतिकाने अक्षय खन्नाच्या 'डोली सजा के रखना' या सिनेमातून तिची अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल गेला. मात्र, ज्योतिकाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. या सिनेमानंतर तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, टॉलिवूडमध्ये गेल्यानंतर तिने फार मोजक्या बॉलिवूड सिनेमात काम केलं. अभिनेता सुर्यासोबत काम करताना ज्योतिकाला प्रेम झाले. या दोघांनी १९९९ मध्ये 'पूवेलम केट्टुपर' या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्यांच्या अफेअरचे वृत्त येऊ लागले. अखेर दोघांनी २००६ मध्ये लग्न केले. सूर्या आणि ज्योतिका या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. मुलं झाल्यानंतर ज्योतिकाचा इंडस्ट्रीतला वावर कमी झाला. परंतु, शैतानच्या निमित्ताने तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलंय. तसेच शबाना आझमीसोबत ती ओटीटी वेब सिरीज 'डब्बा कार्टेल'मध्ये दिसली होती.