लग्नानंतर ५ महिन्यांतच सेलिब्रिटी कपलच्या घरी हलणार पाळणा, शेअर केली गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:37 IST2025-01-22T16:37:09+5:302025-01-22T16:37:29+5:30
दाक्षिणात्य अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक लवकरच आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

लग्नानंतर ५ महिन्यांतच सेलिब्रिटी कपलच्या घरी हलणार पाळणा, शेअर केली गुड न्यूज
गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अशाच एका सेलिब्रिटी कपलने लग्नानंतर अवघ्या पाचच महिन्यात आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. दाक्षिणात्य अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक लवकरच आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
किरण अब्बावरम आणि रहस्याने इन्स्टाग्रामवरुन दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी दिली आहे. यामध्ये अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोनोग्राफीचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
किरण आणि रहस्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लग्नगाठ बांधली होती. कित्येक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. १३ मार्च २०२४ रोजी त्यांनी साखरपुडा केला होता. आता लवकरच ते आईबाबा होणार आहेत. ‘राजा वारू राणी गारू’ या सिनेमातून दोघांनी पदार्पण केलं होतं. ‘एसई कल्याणमंडपम’, ‘सम्माथमे’, ‘रुल्स रंजन’ या चित्रपटांमध्ये किरण झळकला आहे.