'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 13:39 IST2024-02-20T13:38:30+5:302024-02-20T13:39:50+5:30

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्तेत आहे.

south cinema actress samanta ruth prabhu says about sepration period by naga chaitanya in her official youtube channel podcast | 'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख

'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख

Samanta ruth prabhu  : दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्तेत आहे. साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samatha Ruth Prabhu)आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. त्यावेळेस हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. 

घटस्फोटाच्या प्रकरणानंतर अभिनेत्रीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. पण त्याला न जुमानता तिने प्रत्यूत्तर करत टिकाकारांना चांगलच फटकारलं. नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथा डिप्रेशनच्या गर्तेत सापडली. आधी घटस्फोट त्यानंतर मायोसिटीस आजारामुळे तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. या आजाराचे निदान करण्यासाठी समंथा काही काळ अमेरिकेत वास्तव्यास होती. 

सध्या तिने यूट्यूब चॅनेलवर नवा हेल्थ पॉडकास्ट सुरु केलाय. # Take 20 या यू्ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून  अभिनेत्रीने तिच्या भावनांना वाव दिला आहे. या चॅनेलच्या माध्यातून समंथा म्हणाली-  मला आठवतंय की या समस्येच्या एक वर्षापासून सामना करतेय, ते वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला तो दिवस चांगला आठवतो जेव्हा मी माझ्या मित्रांसह मुंबईला परत येत होते. ही गोष्ट जून महिन्याची होती, मुंबईत परतल्यानंतर मी स्वत: ला सेफ समजू लागले. मग मी त्याला सांगितले की आता मला शांतता वाटत आहे.

सामंथा पुढे म्हणाली- हे पॉडकास्ट करण्यामागचे एक कारण म्हणजे मी ज्या भयानक अनुभवातून गेली आहे, त्याबद्दल मला लोकांना सांगायचे होते.  लोकांनी स्वत: ची रोगप्रतिकारक स्थिती आयुष्यभर टिकवावी, त्यामुळे मी अजूनही यातून जात आहे. लोकांनी नाराज होण्याऐवजी सुरक्षित राहावे अशी माझी इच्छा आहे, असं देखील ती म्हणाली.

Web Title: south cinema actress samanta ruth prabhu says about sepration period by naga chaitanya in her official youtube channel podcast