२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:20 IST2025-10-24T18:17:04+5:302025-10-24T18:20:02+5:30
२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल, तुम्ही पाहिला का?

२०२५ मधील सुपरहिट सिनेमा! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडला; ४२ वर्षांच्या 'या' नायकाने केली सगळ्यांची बत्तीगुल
South Cinema: दरवर्षी भारतात शेकडो चित्रपटांची निर्मिती केली जाते. त्यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतात तर काही फ्लॉप होतात. यंदा २०२५ पासून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपटांची मेजवाणी प्रेक्षकांना मिळाली. यावर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु सध्या सिनेसृष्टीत एका चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.या चित्रपटातून ४२ वर्षीय सुपरस्टारने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटाचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे.२०२५ वर्षामध्ये विकी कौशलचा 'छावा' तसेच 'सैयारा' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस अक्षरश: गाजवलं. मात्र, या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत टक्कर देत दुसऱ्याच एका चित्रपटाने इतिहास रचला आहे. विकी कौशलचा "छवा" हा चित्रपट या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.सध्या ज्या चित्रपटाबद्दल बोललं जात आहे तो म्हणजे 'कांतारा चॅप्टर १'.
साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टी यांच्या 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग करत अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते. त्यात आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाने भारतात जवळपास ८०० कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला कॉंटे की टक्कर देत 'कांतारा चॅप्टर -१' ने इंडियन बॉक्स ऑफिसवर ८०९ कोटींचा व्यवसाय केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर १' या अॅक्शन चित्रपटाने दोन आठवड्यात जगभरात ७१७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.तर तिसऱ्या आठवड्यात, चित्रपटाने भारतात ३८ कोटींची कमाई केली. त्यानंतर, पुढील सहा दिवसांत जगभरात एकूण ९२ कोटींचा गल्ला जमवला. ज्यामुळे 'कांतारा चॅप्टर १' ची एकूण कमाई ८०९ कोटींवर पोहोचली. हा चित्रपट २०२२ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा: अ लीजेंड' चा प्रीक्वल आहे. यामध्ये रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.