कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:14 IST2025-10-12T10:08:20+5:302025-10-12T10:14:14+5:30
सासरच्या मंडळींची अट ऐकताच मोडलेला साखरपुडा! ४२ वर्षीय अभिनेत्रीची लग्नाबद्दल प्रतिक्रिया; 'त्या' चर्चा ऐकून संतापली

कोट्याधीश उद्योगपतीसोबत साखरपुडा मोडला अन्; ४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करणार लग्न? 'त्या' चर्चांवर उत्तर देत म्हणाली...
Trisha Krishnan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींचा उल्लेख करायचा झाला तर आवर्जून उल्लेख करावा लागेल असं एक नाव म्हणजे त्रिशा कृष्णण. पोन्नियन सेल्व्हन2', 'लिओ','कुंडवई'तसेच खट्टा मिठा या हिंदी चित्रपटातही तिने दमदार अभिनय केला आहे. अशातच मागील काही दिवसांपासून ही अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरु लागल्या होत्या. ४२ वर्षीय त्रिशा चंदीगढमधील प्रसिद्ध उद्योजकासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरु होती.आता यावर अभिनेत्रीने भाष्य करत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अभिनेत्री त्रिशा कृष्णणने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत मजेशीर उत्तर दिलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत त्यामध्ये लिहिलं होतं की,"मला खूप छान वाटतं जेव्हा लोक माझ्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतात. त्यामुळे आता ते लवकरच माझं हनिमून देखील प्लॅन करतील, याची मी वाट पाहत आहे." अशी लक्षवेधी स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्रिशा कृष्णणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१५ मध्ये उद्योगपती वरुण माननिय यांच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र, त्याचं नातं टिकू शकलं नाही. काही महिन्यांतच त्यांचा साखपुडा मोडला. मिडिया रिपोर्ट्सनुसार,लग्नानंतर त्रिषाला अभिनय क्षेत्रातकाम काम करायचं होतं. मात्र, यासाठी वरुण यांच्या घरातून विरोध होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि हे नातं संपुष्टात आलं.