"नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात" असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 12:16 IST2023-09-10T12:14:49+5:302023-09-10T12:16:15+5:30

मी कोणाही परक्या माणसाला स्क्रीनवर किस करु शकत नाही...

south actress priyamani says no to kissing onscreen as need to give answers to husband | "नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात" असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार

"नवऱ्याला उत्तरं द्यावी लागतात" असं म्हणत अभिनेत्रीने दिला किसींग सीनला नकार

'द फॅमिली मॅन' आणि आता 'जवान' सिनेमामुळे चर्चेत असलेली साऊथ अभिनेत्री प्रियामणिने (Priyamani) आपल्या अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलंय. १० वर्षांपूर्वी तिने शाहरुख खानच्याच 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात 'वन टू थ्री फोर..' हे आयटम साँग केले होते. आता ती शाहरुख सोबत 'जवान' मध्ये दिसत आहे. नुकतंच तिने चित्रपटात किसींग सीन न देण्यावरुन वक्तव्य केले जे चर्चेत आहे.

अभिनेत्री प्रियामणि एका मुलाखतीत म्हणाली, 'मी ऑनस्क्रीन कधीच किसींग सीन देणार नाही. मला माहित आहे की ते केवळ भूमिकेसाठी असतं आणि तो माझ्या कामाचा भाग आहे. पण तरी मी तसे सीन करणार नाही. मी कोणाही परक्या माणसाला स्क्रीनवर किस करु शकत नाही. माझा नवरा आहे आणि मला त्याला  उत्तरं द्यावी लागणार आहेत.'

ती पुढे म्हणाली, 'मला आजपर्यंत अशा भूमिका आल्या नाहीत. जरी पुढे जाऊन मला असे रोल ऑफर झाले तर मी नकार देईन. माझ्या कुटुंबाने मला करिअरसाठी नेहमीच पाठिंबा दिला हे खरं आहे. त्यामुळे मी त्यांना कोणत्याही विचित्र परिस्थितीत टाकणार नाही ही माझी जबाबदारी आहे. माझं कुटुंब माझे सगळे चित्रपट बघतात. त्यांना माहित आहे की हीच माझी नोकरी आहे. म्हणून मी त्यांना काहीही आपत्तीजनक दाखवू शकत नाही. माझ्यावर हे करायची वेळ का आली असा त्यांच्यावर विचार करण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही. मला दुसराच कोणी हात लावतोय असा विचार त्यांनी करायला नको असं मला वाटतं.'

Web Title: south actress priyamani says no to kissing onscreen as need to give answers to husband