प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:00 IST2026-02-13T10:00:00+5:302026-02-13T10:00:00+5:30
Actress: इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी तुम्हाला काम मिळणं बंद होतं त्यावेळी तुमच्या करिअरचे आणि अर्थात तुमचे कसे हाल होतात हे सांगणारं जिवंत उदाहरण म्हणजे ही अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे
कलाविश्व कितीही ग्लॅमरस असलं तरीदेखील त्याची एक काळी बाजूदेखील आहे. अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीत त्यांना आलेल्या विचित्र अनुभवांचंही कथन केलं आहे. त्यामुळे वरवर पाहता ही इंडस्ट्री कितीही ग्लॅमरस वाटलं तरीदेखील त्याचं वास्तव हे फार भीषण आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये एका अभिनेत्रीची चर्चा होतीये. सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा अंत हा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला. मृत्युवेळी तिच्या शरीराला अक्षरश: किडे लागले होते.
इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी तुम्हाला काम मिळणं बंद होतं त्यावेळी तुमच्या करिअरचे आणि अर्थात तुमचे कसे हाल होतात हे सांगणारं जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री निशा नूर. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतांनाच निशा नूरच्या नशीबाचे फासे उलटले आणि ती थेट वेश्या व्यवसायात ढकलली गेली.
साऊथमध्ये होता निशाचा दबदबा
८० च्या दशकात दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निशा नूर. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देऊन निशा लोकप्रिय ढाली होती. १९८० मध्ये मंगला नायकी या सिनेमाच्या माध्यमातून तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. कमल हासन, रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही तिने काम केलं होतं.
निर्मात्याने अभिनेत्रीला ढकललं वेश्या व्यवसायात?
यशाच्या शिखरावर असतांनाच निशाच्या करिअरला अचानकपणे उतरती कळा लागली आणि तिचं नशीब जोरदार कोसळलं. मिडिया रिपोर्टनुसार, एका निर्मात्याने निशाची फसवणूक केली आणि तिला वेश्या व्यवसायात ढकललं. या वेश्या व्यवसायात ती अशा प्रकारे अडकली की तिला बाहेर पडणं अशक्य झालं होतं. परिणामी, तिने कलाविश्वापासून फारकत घेतली.
मृत्युपूर्वी झाले प्रचंड हाल
निशाचा इंडस्ट्रीतील वावर कमी झाल्यामुळे कलाविश्वानेही तिच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायबच झाली. असं म्हटलं जातं. मृत्यूपूर्वी निशा एका दर्ग्याबाहेर अत्यंत वाईट अवस्थेत दिसून आली. यावेळी तिच्या शरीराला अक्षरश: किडे लागले होते. निशा आर्थिक संकटात असतांना तिला कोणीही आधार दिला नाही. इतकंच नाही तर शेवटच्या दिवसात तिचे इतके हाल झाले की तिच्या शरीराचा फक्त हाडांचा सापळा तेवढा दिसत होता. सुत्रांच्या माहितीनुसार, एका एनजीओने निशाला मदत केली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर एकाच आठवड्यात तिचा मृत्यू झाला.