हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:01 IST2024-12-16T08:57:49+5:302024-12-16T09:01:06+5:30

सध्या सोशल मीडियावर साउथ क्वीन अभिनेत्री किर्ती सुरेशच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

south actress keerthy suresh got married with boyfriend antony thattil did christian wedding in goa photo viral on social media | हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

Keerthy Suresh Wedding: साउथ क्वीन, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश (keerthy suresh) . अलिकडेच किर्तीने तिचा बॉयफ्रेंड अँटनी थैटिलसोबत लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. १२ डिसेंबरच्या दिवशी किर्ती-अँटनी यांचा लग्नसोहळा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने गोव्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सुद्धा इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान,अभिनेत्री किर्ती सुरेशचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय, याचं कारणही तितकंच खास आहे. पारंपरिक दाक्षिणात्य रितीरिवाजानूसार लग्न केल्यानंतर किर्ती आणि अँटनी यांनी ख्रिश्चन पद्धतीने केलं आहे. 


गोव्यातील बिचवर किर्ती-अँटनीने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. आपल्या कुटुंबीयांसह मित्र-मंडळींसोबत ते दुसऱ्यादा विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर किर्ती सुरेशच्या या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री किर्ती सुरेशने ख्रिश्चन वेडिंगसाठी व्हाइट गाऊन परिधान केला होता. त्यावर सुंदर पद्धतीने  विणकाम करण्यात आहे. तर अँटनीने पांढरा सूट त्यासोबत ब्राऊन लेदर शूज घातले होते. असा पद्धतीने दोघांनीही त्यांचा लूक पूर्ण केला आहे. किर्तीने "ForTheLoveOfNyke" असा हॅशटॅग देत तिच्या या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून अँटनी थाटीलला डेट करत होती. अगदी काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अँटनी थाटीलबरोबर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून किर्तीने त्यांच्या नात्याची कबुली दिली. किर्ती सुरेश ही दाक्षिणात्य चित्रपट निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. किर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'गीतांजली' या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने सिनेसृष्टीत  पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Web Title: south actress keerthy suresh got married with boyfriend antony thattil did christian wedding in goa photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.