'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर साऊथ अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली, 'त्यांच्यासोबत स्टेजवर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:54 IST2024-05-31T11:53:30+5:302024-05-31T11:54:02+5:30

साऊथ अभिनेते नंदमुरी बालकृष्ण अभिनेत्रीला स्टेजवर अक्षरश: ढकलतात.

South actress Anjali reacts to viral video where Nandamuri Balkrishna pushes her on stage | 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर साऊथ अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली, 'त्यांच्यासोबत स्टेजवर...'

'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर साऊथ अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली, 'त्यांच्यासोबत स्टेजवर...'

काल दिवसभर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि नेते नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balkrishna) एका कार्यक्रमात स्टेजवरच अभिनेत्रीला ढकलतात. हा व्हिडिओ बघून सोशल मीडियावर नंदमुरी यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. अनेक सेलिब्रिटींनीही निंदा केली. आता अभिनेत्रीने स्वत:च ट्वीट करत त्या घटनेवर भाष्य केलं आहे.

अभिनेत्री अंजली (Anjali)  साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. त्या व्हिडिओनंतर तिने ट्वीट करत लिहिले, "गँग्स ऑफ गोदावरीच्या प्री रिलीज इव्हेंटला बालकृष्ण सरांनी हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मला सांगायला आवडेल की बालकृष्ण सर आणि माझ्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. अनेक वर्षांपासून आमच्यात चांगली मैत्री आहे.  त्यांच्यासोबत पुन्हा एकदा स्टेजवर येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे."

अंजलीने हे ट्वीट करत नंदमुरी बालकृष्ण यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिलं आहे. 'गँग्स ऑफ गोदावरी'या तिच्या आगामी सिनेमाचा तो इव्हेंट होता. यावेळी स्टेजवर नंदमुरी बालकृष्ण अंजलीला चक्क स्टेजवरच ढकलतात. तेव्हा बाजूला असलेली दुसरी अभिनेत्री तिला धरते. अंजली आणि स्टेजवरचे सगळेच हे हसण्यावर नेतात. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि सर्वांनीच नंदमुरी यांच्यावर टीका केली. तसंच अंजलीला हे ट्वीट करण्यास भाग पाडलंय असा सूर आता अनेकांनी लावला आहे. 

Web Title: South actress Anjali reacts to viral video where Nandamuri Balkrishna pushes her on stage