"सगळे मर्दानगी दाखवणारे सिनेमे करत होते अन् मी...", दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचं पुन्हा बेधडक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:01 IST2025-01-29T13:00:42+5:302025-01-29T13:01:23+5:30
नकार देणं अनेकदा आव्हानात्मक होतं पण...

"सगळे मर्दानगी दाखवणारे सिनेमे करत होते अन् मी...", दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचं पुन्हा बेधडक विधान
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत असतो. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे तो चर्चेत असतो. नुकतंच हैदराबाद साहित्य महोत्सवात त्याने हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीविषयी भाष्य केलं. सिनेमातील टॉक्सिक भूमिकांच्या ऑफर अनेकदा नाकारल्याचा खुलासा त्याने केला. नकार देणं अनेकदा आव्हानात्मक होतं पण त्याला यामुळे समाधान मिळालं असंही तो म्हणाला.
अभिनेता सिद्धार्थने हैदराबाद साहित्य महोत्सवात प्रसिद्ध गायिका आणि लेखिका विद्या राव यांच्यासोबत संवाद साधला. विद्या राव या आदिती राव हैदरीची आई आहे त्यामुळे नात्याने सिद्धार्थच्या सासू आहेत. या चर्चेत दोघांनी सिनेमाच्या अनेक पैलूंवर संवाद साधला. सिद्धार्थ म्हणाला, "मला अनेकदा अशा स्क्रीप्ट मिळाल्या आहेत ज्यात मला महिलांच्या कानाखाली मारायची असते, आयटम साँग असतं, कोणाच्या बेंबीवर चुटकी मारायची, एखाद्या महिलेला तिने काय करावं, कुठे जावं कुठे नाही हे सांगायचं इत्यादि. अशा भूमिका मी लगेच नाकारल्या आहेत. माझ्या आसपास अनेकजण आक्रमक आणि मर्दानगी दाखवणाऱ्या भूमिका करत होते. अशा वेळी जेव्हा लोक 'मर्द को दर्द नही होता' सारख्या गोष्टी बोलत होते तेव्हा मला मी मात्र स्क्रीनवर रडण्यात आनंदी होतो."
सिद्धार्थ नुकताच 'मिस यू' या तमिळ सिनेमात दिसला. आता त्याचा आगामी 'द टेस्ट' रिलीज होणार आहे. यामध्ये नयनतारा आणि आर माधवनही आहे. शिवाय त्याचा 'इंडियन ३' ही रिलीज होणार आहे. गेल्या वर्षीच सिद्धार्थने अदिती राव हैदरीसोबत लग्नगाठ बांधली.