विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:48 IST2026-03-27T16:48:07+5:302026-03-27T16:48:56+5:30

राहुलच्या भावाचं पॅराक्वेट या विषारी कीटकनाशकामुळे निधन झालं आहे. भावाच्या निधनाने राहुल रामकृष्णच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

south actor rahul ramkrishna brother dies due to paraquat poisining appealed to narendra modi | विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला...

विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला...

साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेता राहुल रामकृष्ण याच्या कुटुंबात एक दु:खद घटना घडली आहे. राहुलच्या भावाचं पॅराक्वेट या विषारी कीटकनाशकामुळे निधन झालं आहे. भावाच्या निधनाने राहुल रामकृष्णच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत राहुलने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅराक्वेट या कीटकनाशकावर बंदी घालण्याची थेट मागणी केली आहे. 

राहुलने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने असं म्हटलं आहे की "आज मी माझ्या भावाला 'पॅराक्वेट' या विषारी कीटकनाशकामुळे गमावलं आहे. हे अत्यंत घातक आहे आणि आत्महत्येसाठी याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. हे बाजारात इतक्या सहज उपलब्ध होतं, हे पाहून मला धक्का बसला आहे. डॉक्टरांकडे अशा केसेसची संख्या वाढत चालली असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कृपया यावर लवकरात लवकर बंदी घाला आणि लोकांचे प्राण वाचवा". या ट्वीटमध्ये त्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनादेखील टॅग केलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, राहुलच्या भावाचे पॅराक्वेटची विषबाधा झाल्यामुळे निधन झालं आहे. पॅराक्वेटचा वापर शेतीमध्ये तण नष्ट करण्यासाठी केला जातो. या कीटकनाशकाच्या संपर्कात व्यक्ती आला किंवा त्याची विषबाधा झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. यावर कोणतेही अँटिडोट उपलब्ध नसल्याने प्राण वाचण्याची शक्यता कमी असते.

Web Title : भाई कीटनाशक से मरा, राहुल रामकृष्ण ने पीएम मोदी से प्रतिबंध लगाने की मांग की

Web Summary : अभिनेता राहुल रामकृष्ण के भाई की पैराक्वाट जहर से मौत हो गई। उन्होंने पीएम मोदी से आसानी से उपलब्ध, घातक कीटनाशक पर प्रतिबंध लगाने का आग्रह किया, बढ़ते मामलों और एंटीडोट की कमी का हवाला दिया।

Web Title : Actor Rahul Ramakrishna Demands Ban After Brother's Pesticide Death

Web Summary : Actor Rahul Ramakrishna's brother died from paraquat poisoning. He urges PM Modi to ban the readily available, lethal pesticide, citing rising cases and lack of antidote.