ओटीटीवर 'कांतारा'ला टक्कर देतोय 'हा' चित्रपट, सस्पेन्स इतका की जागीच खिळून बसाल! तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:28 IST2025-10-07T16:24:25+5:302025-10-07T16:28:38+5:30
'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा कांताराला देतो टक्कर! २ तास ४४ मिनिटांचा सिनेमा पाहताना स्क्रिनवरून नजर हटणार नाही

ओटीटीवर 'कांतारा'ला टक्कर देतोय 'हा' चित्रपट, सस्पेन्स इतका की जागीच खिळून बसाल! तुम्ही पाहिला का?
OTT Movies: ओटीटीवर आता वेगवेगळ्या भाषेतील तसेच जॉनरचे चित्रपट पाहण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. सध्या डिजीटल माध्यमावर लोक क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्स असलेल्या चित्रपटांना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे.अशाच एका चित्रपटाची ओटीटीवर चर्चा आहे. या चित्रपटाने IMDb रेटिंगमध्ये कांतारालाही मागे टाकलं आहे. या चित्रपटाचं नाव वाडा चेन्नई आहे. या चित्रपटातील थरारक कथेने ओटीटी प्रेमींची मनं जिंकली आहेत.
वादा चेन्नई हा चित्रपट थ्रिलर,अॅक्शन आणि ड्रामा यांचा एक उत्तम मिलाफ आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता तसंच या चित्रपटाचं समीक्षकांकडूनही कौतुक झालं होतं.या चित्रपटात धनुषने कॅरम खेळाडूची भूमिका साकारली आहे. तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत ऐश्वर्या राजेश आहे. या दोघांव्यतिरिक्त, चित्रपटात अँड्रिया जेरेमिया, अमीर, डॅनियल बालाजी, समुथिरकानी, किशोर, करुणास, सुब्रमण्यम शिवा आणि चिनू मोहन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'टक्कर देतो.
आयएमडीबीवर 'कांतारा'ला ८.२ रेटिंग आहे, तर 'वाडा चेन्नई'ला ८.४ रेटिंग आहे.
'वाडा चेन्नई'ची कथा एका कॅरम खेळाडूभोवती फिरते, जो परिस्थितीमुळे गुन्हेगार बनतो. त्यानंतर तो हळूहळू तो स्थानिक माफिया टोळीत सामील होतो.पण जेव्हा त्याला कळते की त्याचा स्वतःचा परिसर उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, तेव्हा तो हा कट उधळून लावण्याचा प्लॅन आखतो. चित्रपटाच्या कथेत सतत असे ट्विस्ट येत राहतात, जे क्षणभरही पडद्यापासून दूर जाऊ देत नाहीत.चित्रपटात दाखवलेलं संस्कृतीचं दर्शन, राजकारण या गोष्टी चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवतात . वाडा चेन्नई अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.