शाहरुख खानने नाकारली रजनीकांत यांच्या 'जेलर २' मधील भूमिका; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:05 IST2026-04-08T13:04:06+5:302026-04-08T13:05:32+5:30

शाहरुख खानने का दिला नकार?

Shah Rukh Khan rejected cameo in jailer 2 starring rajinikanth know reason | शाहरुख खानने नाकारली रजनीकांत यांच्या 'जेलर २' मधील भूमिका; नेमकं कारण काय?

शाहरुख खानने नाकारली रजनीकांत यांच्या 'जेलर २' मधील भूमिका; नेमकं कारण काय?

'किंग खान' आणि थलायवा रजनीकांत या दोन महानायकांना एकाच पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर २' या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या भूमिकेत (कॅमिओ) दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ताज्या अपडेटनुसार शाहरुखने या प्रोजेक्टमधून माघार घेतली असून, आता तो पूर्णपणे आपल्या 'किंग' या आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रित करणार आहे.

पिंकविला रिपोर्टनुसार, 'जेलर २'च्या मेकर्सने शाहरुख खानला कॅमिओसाठी विचारणा केली होती. या भूमिकेच्या चित्रीकरणासाठी साधारण पाच दिवसांचा कालावधी लागणार होता आणि सुरुवातीला शाहरुखने यासाठी होकारही दिला होता. मात्र, आपल्या ऑनस्क्रीन इमेजची आणि आगामी चित्रपटातील लूकची गुप्तता राखण्यासाठी किंग खानने या चित्रपटात काम करण्यास नम्रपणे नकार दिला.

विशेष म्हणजे, शाहरुखने स्वतः सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्याने यावेळी व्यक्त केली. शाहरुखला वाटत होते की 'जेलर २' प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा 'किंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यावा, जेणेकरून त्याचा चित्रपटातील लूक एक्सक्लुझिव्ह राहील. मात्र, तांत्रिक कारणांमुळे तसे झाले नाही आणि त्याने या कॅमिओपासून लांब राहणेच पसंत केले.

शाहरुख खान सध्या 'किंग' चित्रपटासाठी एका वेगळ्या आणि खास लूकवर काम करत आहे. तो आपली ऑनस्क्रीन उपस्थिती फक्त त्याच चित्रपटासाठी मर्यादित ठेवू इच्छितो, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये त्या लूकबाबतची उत्सुकता टिकून राहील. दुसरीकडे, 'जेलर २'चे निर्माते आता या कॅमिओ रोलसाठी दाक्षिणात्य किंवा बॉलिवूडमधील इतर बड्या कलाकारांच्या नावांचा विचार करत आहेत. या चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सुपरस्टार शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहरुखची लेक सुहाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Web Title : शाहरुख खान ने रजनीकांत की 'जेलर 2' में भूमिका क्यों ठुकराई?

Web Summary : शाहरुख खान ने रजनीकांत की 'जेलर 2' में कैमियो करने से इनकार कर दिया क्योंकि वह अपनी आगामी फिल्म 'किंग' में अपने लुक को खास बनाए रखना चाहते थे। उन्होंने रजनीकांत को यह बात बताई और भविष्य में साथ काम करने की इच्छा जताई।

Web Title : Shah Rukh Khan declines 'Jailer 2' role: Here's Why

Web Summary : Shah Rukh Khan turned down a cameo in Rajinikanth's 'Jailer 2' to maintain the exclusivity of his look in his upcoming film 'King'. He conveyed this to Rajinikanth, expressing interest in future collaborations.