"सगळं प्लॅनिंग फसलं, आता आयुष्याकडून काहीच अपेक्षा नाही" समंथाने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:10 IST2024-11-29T13:09:35+5:302024-11-29T13:10:06+5:30
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहे.

"सगळं प्लॅनिंग फसलं, आता आयुष्याकडून काहीच अपेक्षा नाही" समंथाने व्यक्त केल्या भावना
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही साऊथमधील आघाडीची अभिनेत्री. सध्या ती हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीवर आहे. नुकतीच तिची 'सिटाडेल हनी बनी' सीरिज रिलीज झाली. समंथाचं वैयक्तिक आयुष्यही काही काळापासून चर्चेत आहे. आधी घटस्फोट नंतर मायोसायटिस आजाराचं निदान यामुळे तिच्या आयुष्याच वादळ आलं. यातून आता ती सावरत आहे. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत तिने याविषयी भावना व्यक्त केल्या.
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहे. यामुळे समंथाविषयी अनेकांना सहानुभूती वाटत आहे. दरम्यान एका मुलाखतीत समंथा म्हणाली, "२०२१ मध्ये जे काही झालं त्यानंतर माझी भविष्याकडून काहीच आशा राहिलेली नाही. मी सावधानतेने केलेलं सगळं नियोजनच फसलं त्यामुळे आता जे काही होईल त्यासाठी मी तयार आहे. मी प्रत्येक वर्षी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन एवढंच मला माहित आहे."
समंथा आणि नागा चैतन्य ८ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २०१७ साली त्यांनी ग्रँड वेडिंग केलं. मात्र २०२० मध्ये त्यांच्यात बिनसल्याची चर्चा झाली. तर २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. समंथाला या दु:खातून सावरण्यास बराच वेळ लागला. तर दुसरीकडे नागा चैतन्य ४ डिसेंबर रोजी शोभिता धुलिपालासोबत लग्न करत आहे. नागाच्या लग्नाआधीच समंथाने केलेले हे वक्तव्य चर्चेत आहे.