'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी दिसणार साऊथची सुपरस्टार, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:41 IST2026-01-29T09:40:06+5:302026-01-29T09:41:27+5:30

'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी लागण्याची चर्चा आहे. 

Sai Pallavi Replaces Deepika Padukone In Prabhas Kalki 2 Find Out | 'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी दिसणार साऊथची सुपरस्टार, कोण आहे ती?

'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी दिसणार साऊथची सुपरस्टार, कोण आहे ती?

Kalki 2 : दिग्दर्शक नाग अश्विन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कल्की २' सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता तिच्या जागी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी लागण्याची चर्चा आहे. 

'क्लायमॅक्स इंडिया'च्या एका सोशल मीडिया पोस्टनुसार, दीपिकाच्या जागी आता ३३ वर्षीय साई पल्लवीचे नाव निश्चित झाले आहे. साई पल्लवी ही तिच्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाते. जर ही बातमी खरी ठरली, तर प्रभास आणि साई पल्लवी ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. निर्माते लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

साई पल्लवीचे आगामी प्रोजेक्ट्स
साई पल्लवी सध्या तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात आहे. ती लवकरच रणबीर कपूरसोबत रामायण या चित्रपटात 'माता सीता' या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट याच वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत ती 'एक दिन का नाम' रोमँटिक ड्रामामध्ये काम करत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यसोबतही तिचा 'थंडेल' हा मोठा चित्रपट येत आहे.

'कल्की २'मधून दीपिका पादुकोणला काढल्याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती.  तर दुसरीकडे दीपिका 'किंग' आणि अॅटलीच्या आगामी सिनेमत व्यग्र आहे.

Web Title : 'कल्कि 2' में दीपिका पादुकोण की जगह लेंगी साई पल्लवी?

Web Summary : खबर है कि 'कल्कि 2' में दीपिका पादुकोण की जगह साई पल्लवी लेंगी। साई पल्लवी अपनी स्वाभाविक अभिनय क्षमता के लिए जानी जाती हैं। जल्द ही आधिकारिक घोषणा होने की उम्मीद है। वह 'रामायण' और 'थंडेल' में भी दिखाई देंगी।

Web Title : Sai Pallavi replaces Deepika Padukone in 'Kalki 2' sequel?

Web Summary : Sai Pallavi is rumored to replace Deepika Padukone in 'Kalki 2'. Sai Pallavi is known for her natural acting skills. An official announcement is expected soon. She will also be seen in 'Ramayana' and 'Thandel'.