'कांतारा चॅप्टर १' नंतर ऋषभ शेट्टीचं मोठं प्लॅनिंग, 'या' ३ चित्रपटांतून बॉक्स ऑफिस गाजवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:43 IST2025-10-17T14:41:52+5:302025-10-17T14:43:31+5:30
'कांतारा चॅप्टर १'नंतर ऋषभच्या पुढच्या चित्रपटांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'कांतारा चॅप्टर १' नंतर ऋषभ शेट्टीचं मोठं प्लॅनिंग, 'या' ३ चित्रपटांतून बॉक्स ऑफिस गाजवणार
ऋषभ शेट्टी हा उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. ऋषभ शेट्टीचा अभिनय थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडतो. सध्या त्याच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटानं जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथेपासून ते त्यातील गाण्यापर्यंत सर्वकाही लोकांच्या पसंतीस उरत आहे. अभिनयासोबत ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. 'कांतारा' आणि 'कांतारा चॅप्टर १'च्या यशामुळे ऋषभ आता पॅन-इंडिया स्टार बनला आहे. 'कांतारा चॅप्टर १'नंतर ऋषभच्या पुढच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
ऋषभ शेट्टी आता एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा' आणि 'कांतारा चॅप्टर १'च्या यशानंतर त्याचे आगामी ३ मोठे सिनेमे येत आहेत. ऋषभ शेट्टीचा पुढील बहुप्रतिक्षित बिग बजेट चित्रपट 'छत्रपती शिवाजी महाराज' हा असणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची पटकथा जवळजवळ पूर्ण झाली असून त्याचे शूटिंग २०२६ मध्ये सुरू होणार आहे. फिल्मीबीटमधील वृत्तानुसार, ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट २०२७ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या यादीतील दुसरा चित्रपट आहे जय हनुमान'. ऋषभ शेट्टी हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा मेगा-बजेट चित्रपट प्रशांत वर्मा दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग या वर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक आणि पोस्टर काही दिवसांपुर्वीच समोर आलंय. या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर २०२४ मध्ये करण्यात आली होती आणि याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळला.
दिग्दर्शक जयतीर्थ यांच्या बेल बॉटम सीक्वल या कन्नड चित्रपटाने साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत इतिहास घडवला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याला अफाट प्रतिसाद मिळाला होता. आता ऋषभ शेट्टी या चित्रपटाच्या सिक्वेलद्वारे पुन्हा एकदा थिएटरमध्ये धमाका करण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय ऋषभ शेट्टी दिग्दर्शक म्हणून ‘रुद्रप्रयाग’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच त्यांचा पुढचा प्रोजेक्ट 'नाथूराम' येणार आहे. काही अहवालांनुसार,'कांतारा चॅप्टर १' च्या यशानंतर मेकर्स त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा लवकरच करू शकतात. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.