कांतारा चॅप्टर-1 चा टीझर रिलीज, रिषभ शेट्टीचे 'वराह रुप' पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:55 IST2023-11-27T16:38:32+5:302023-11-27T16:55:26+5:30

रिषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Rishabh Shetty s Kantara Chapter 1 Teaser Released fans amused shoot start in december | कांतारा चॅप्टर-1 चा टीझर रिलीज, रिषभ शेट्टीचे 'वराह रुप' पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

कांतारा चॅप्टर-1 चा टीझर रिलीज, रिषभ शेट्टीचे 'वराह रुप' पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

'कांतारा चॅप्टर 1' ची पहिली झलक समोर आली आहे. गेल्या वर्षी 'कांतारा : अ लीजेंड' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता चॅप्टर 1 बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. नुकतंच मेकर्सने फिल्मची झलक शेअर केली आहे. कांतारा प्रिक्वेलबाबत मोठी चर्चा रंगली आहे. फिल्मचा टीझर पाहिलात का?

रिषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कांतारा चॅप्टर 1 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. त्याच्या भूमिकेने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना पुढील वर्षी फिल्मच्या रिलीजची आतुरता आहे. टीझर सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे. यामध्ये रिषभ शेट्टीचा भयानक अवतार पाहायला मिळतोय.

पुढील वर्षी सुरु होणाऱ्या सिनेमाचं शूटिंग डिसेंबरमध्ये सुरु होईल. हा सिनेमा सात भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कन्नडसोबतच  तमिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी आणि बंगाली भाषेत सिनेमा रिलीज होईल. अद्याप सिनेमातील अन्य कलाकारांबाबतीत खुलासा झालेला नाही. 

Web Title: Rishabh Shetty s Kantara Chapter 1 Teaser Released fans amused shoot start in december