मंदिरात फोटो काढल्यामुळे पापाराझींवर संतापला रामचरण; सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:54 IST2024-03-27T14:54:18+5:302024-03-27T14:54:43+5:30

Ram charan: रामचरण त्याच्या पत्नी आणि लेकीसह तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

ram-charan-got-angry-on-paparazzi-they-follow-him-in-tirupati-temple | मंदिरात फोटो काढल्यामुळे पापाराझींवर संतापला रामचरण; सुनावले खडे बोल

मंदिरात फोटो काढल्यामुळे पापाराझींवर संतापला रामचरण; सुनावले खडे बोल

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे राम चरण (ram charan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या अभिनेत्याने साऊथसह संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्याचं नाटू नाटू गाणं तर संपूर्ण जगभरात गाजलं आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता पार सातासमुद्रापार पर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच, तो कुठेही स्पॉट झाला की चाहते आणि पापाराझी त्याच्या भोवती घोळका करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर रामचरणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो पापाराझींवर संतापल्याचं दिसून येत आहे.

 रामचरण आज (२७ मार्च) त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे नुकतंच त्याने पत्नी उपासना आणि लेक क्लीन कारा यांच्या समवेत तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. मात्र, त्याला या मंदिरात पाहाताच पापाराझी त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करु लागले. परिणामी, रामचरण संतापला आणि त्याने पापाराझींना खडे बोल सुनावले.

रामचरणला मंदिरात पाहिल्यानंतर पापाराझींनी त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी उपासनाने लेकीचा चेहरा झाकायचा प्रयत्न केला. मात्र, पापाराझी फोटो काढणं काही थांबवत नव्हते. त्यामुळे रामचरण चांगलाच संतापला. आणि, त्याने पापाराझींना फोटो काढू नका, असं खडसावलं.

दरम्यान, रामचरण आणि उपासना यांनी लेकीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिला प्रायव्हेट लाइफ द्यायची असून लाइम लाइटपासून दूर ठेवायचं आहे, असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

Web Title: ram-charan-got-angry-on-paparazzi-they-follow-him-in-tirupati-temple