Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:57 IST2025-04-01T17:56:58+5:302025-04-01T17:57:32+5:30
Pushpa Movie : साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात दिसला होता. 'पुष्पा' फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढली आहे.

Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण
साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) शेवटचा 'पुष्पा: द रुल' (Pushpa The Rule) या चित्रपटात दिसला होता. 'पुष्पा' फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढली आहे. अल्लू अर्जुनची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत आहे. अल्लू अर्जुन 'पुष्पा राज'च्या आयकॉनिक भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती कधीच नव्हती हे फार कमी लोकांना माहीत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी साऊथच्या बड्या सुपरस्टारला 'पुष्पा राज'ची भूमिका करण्यास सांगितले होते. चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता?
'पुष्पा राज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनशी संपर्क साधण्यापूर्वी निर्मात्यांनी साऊथचा सुपरस्टार महेश बाबूशी चर्चा केली होती. महेश बाबू निर्मात्यांची पहिली पसंती होती. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान 'पुष्पा' फ्रँचायझीचे दिग्दर्शक महेश बाबू यांनी याचा खुलासा केला आहे. या भूमिकेसाठी महेश बाबू परफेक्ट असल्याचे निर्मात्यांनाही वाटले. पण महेश बाबूने 'पुष्पा' फ्रँचायझी नाकारली होती. 'पुष्पा पार्ट १ आणि २' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा ३' या चित्रपटासाठी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचे नाव पुढे येत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनची आता विजय देवरकोंडासोबत टक्कर होऊ शकते. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनकडे सध्या ॲटली कुमारचा एक ॲक्शन चित्रपट आहे.