'पुष्पा' फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:56 PM2023-12-07T12:56:24+5:302023-12-07T12:58:19+5:30

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा : द राईज’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता जगदीश प्रताप बंडारी याला पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

'Pushpa' fame actor Jagdish Pratap arrested, woman's family makes serious allegations | 'पुष्पा' फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

'पुष्पा' फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा : द राईज'(Pushpa: The Rise)मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता जगदीश प्रताप बंडारी (Jagdish Pratap Bandari) याला पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. जगदीशने पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनचा मित्र केशवची भूमिका साकारली होती.

३० वर्षीय जगदीश प्रताप बंडारी एका ज्युनियर आर्टिस्टसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या महिलेने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी जगदीशवर आरोप केला आहे. तक्रार आणि तपासाच्या आधारे पुष्पा फेम अभिनेत्याला बुधवारी कलम ३०६ अन्वये अटक करण्यात आली. मृत महिलेने काही लघुपटांमध्ये काम केले होते.

संबंधित महिलेने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. पोलिस तपासादरम्यान, पुंजागुट्टा पोलिसांना कळले की, जगदीशने मृत महिलेची व्हिडिओ क्लिप २७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या पुरुषासोबत असताना बनवली होती. जगदीशने महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिचे खासगी फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली, त्यानंतर तिने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर जगदीश हा फरार होता आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पोलिसांनी पुष्पा फेम अभिनेत्याला रिमांडवर पाठवले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

वर्कफ्रंट...
जगदीश शेवटचा माइथ्री मूव्ही मेकर्सच्या छोट्या बजेट नाटक, सत्थी गनी रेंदू येकरलूमध्ये दिसला होता. तो लवकरच नीतिन आणि श्रीलीला यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन आणि लवकरच प्रदर्शित होणार्‍या ग्रामीण नाटक, अंबाजीपेटा मॅरेज बँडमध्ये दिसणार आहे.


 

Web Title: 'Pushpa' fame actor Jagdish Pratap arrested, woman's family makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Pushpaपुष्पा