'पुष्पा २' लवकरच होणार OTTवर रिलीज, या प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:22 IST2024-12-05T18:16:32+5:302024-12-05T18:22:23+5:30
Pushpa 2 Movie OTT Release : 'पुष्पा २' नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता या ओटीटी प्लेटफॉर्मने चित्रपटाचे राइट्स विकत घेतल्याचे समजते आहे.

'पुष्पा २' लवकरच होणार OTTवर रिलीज, या प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल इतके कोटी
अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा २ द रुल' (Pushpa 2 The Rule Movie) हा या वर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट होता. गेल्या तीन वर्षांपासून बनवण्यात येत असलेला हा ॲक्शन थ्रिलर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर ५ डिसेंबर रोजी जगभरात भव्य रिलीज झाला. सुकुमार (Director Sukumar) दिग्दर्शित या चित्रपटाने टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. त्यामुळेच चित्रपटाचे बंपर ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. यासह 'पुष्पा २ द रुल'ची सुरुवात चांगली झाली आहे. प्रेक्षक या चित्रपटाला पैसा वसूल म्हणत आहेत. तर अल्लू अर्जुनच्या परफॉर्मन्सला फायर नाही तर वाइल्ड फायर म्हणत आहेत. दरम्यान, आता समजते आहे की, या चित्रपटाचे राइट्स एका ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतेल आहे.
फिल्मीबिटच्या रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्स इंडियाने सर्व भाषांसाठी 'पुष्पा २ द रुल' चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स विकत घेतले आहेत. यासाठी त्यांना २७० कोटी रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी करेल इतक्या कोटींची कमाई
'पुष्पा २'ला अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या वर कमाई करण्याचे संकेत दिले आहेत. सॅकनिक या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासून दुपारी ३ ते ३.३० वाजेपर्यंत या सिनेमाने तब्बल ५८ कोटी ४७ लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट दिवसभरात १०० ते २०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जातोय.
'पुष्पा २ द रुल'ची स्टार कास्ट
'पुष्पा २ द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखनही त्यांनी केले आहे. या चित्रपटाचे सहलेखन श्रीकांत विसा यांनी केले आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स बॅनरचे नवीन येरनेनी आणि यलमांचिली रविशंकर निर्मित, या चित्रपटाचे संकलन कार्तिक श्रीनिवास आणि रुबेन यांनी केले आहे. पुष्पा २ मध्ये अल्लू अर्जुनने पुष्पराजच्या भूमिकेत, रश्मिका मंदानाने श्रीवल्लीच्या भूमिकेत आणि फहद फासिलने भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे लोक चाहते झाले आहेत. त्यामुळे रश्मिका आणि फहाद यांच्याही कामाचे कौतुक होताना दिसत आहे.