'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:38 IST2024-12-05T10:37:52+5:302024-12-05T10:38:36+5:30

दरम्यान सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 

Pushpa 2 The Rule allu arjun movie twitter review fans love jathara sequence | 'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) बहुप्रतिक्षित 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule) आज थिएटरमध्ये धडकला आहे. पुष्पा २ चं वादळच आलं आहे. कारण सिनेमा कोट्यवधींची कमाई करणार हे निश्चितच आहे. अल्लू अर्जुनचे दमदार डायलॉग्स, हटके स्टाईल, गाणी, अॅक्शन असा सगळाच मसाला सिनेमात आहे. फहाद फासिलची व्हिलनगिरी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. 

२०२१ साली 'पुष्पा: द राईज' रिलीज झाला होता. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या जोडीने कमाल केली. एकापेक्षा एक डालॉग्स, हटके डान्स, गाणी यामुळे सिनेमा खूप गाजला. आता दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिलची जोरदार टक्कर आहे. दरम्यान ट्विटरवर सिनेमाचे रिव्ह्यू येण्यास सुरुवात झाली आहे. 

एका युजरने लिहिले,"पुष्पा २...पहिला भाग जिथे संपला तिथूनच दुसरा सुरु होतो. मध्येच सिनेमा थोडा मोठा वाटतो. संपूर्णपणे नाट्य घडामोडी सुरु असतात. मात्र दिग्दर्शक सुकुमार यांनी कमर्शियल पद्धतीने चांगली बांधणी केली आहे. अल्लू अर्जुनचा शानदार परफॉर्मन्स , बॅकग्राऊंड म्युझिक काही ठिकाणी मस्त वाटते मात्र काही जागी आणखी प्रभावी झाले असते. काही ठिकाणी डायलॉग समजणं जरा अवघड आहे."

आणखी एकाने लिहिले, "मेगा ब्लॉकबस्टर. वाईल्टफायर एंटरटेनर. सगळ्याच बाजूने सॉलिड सिनेमा. सुकुमार जादूगार आहे. बॉक्सऑफिसवर तुफान आणलं आहे."

अनेकांनी सिनेमातील जतारा सीक्वेन्सचं खूप कौतुक केलं आहे. या सीनवर टाळ्यांचा कडकडाट झाला आहे. सिनेमा प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे हे नक्की. आता सिनेमाची कमाई नक्की होते हे पाहणं महत्वाचं आहे. 

Web Title: Pushpa 2 The Rule allu arjun movie twitter review fans love jathara sequence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.