अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:16 IST2024-11-06T10:16:06+5:302024-11-06T10:16:26+5:30

'पुष्पा 2: द रुल' चं खतरनाक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Pushpa 2: The Rule Allu Arjun And Fahadh Faasil New Faceoff Poster Release | अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा

अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा

Pushpa 2 New Poster Out : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची जगभराच चर्चा आहे. 'पुष्पा 2: द रुल'  हा सिनेमा 2024 मधील मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी एक आहे. येत्या  ५ डिसेंबर २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते तर सिनेमा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.  अशातच आता 'पुष्पा 2: द रुल' चं खतरनाक फेस ऑफ पोस्टर  रिलीज करण्यात आलं आहे.

 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिना उरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी निर्मात्यांनी 'पुष्पा - द रुल'चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या नव्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. यामध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल हे आमने-सामने असल्याचं दिसतंय. नव्या पोस्टरला चाहत्यांनी चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 

पुष्पा: द राइज'च्या या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यात भयानक लढत पाहायला मिळणार आहे. अल्लू अर्जुन हा पुष्पाच्या भुमिकेत तर फहाद फासिल हा पोलिस अधिकारी भवरच्या भूमिकेत पुन्हा भाव खाऊन जाईल यात शंका नाही. कोण कोणावर मात करणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.   पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. 
 

Web Title: Pushpa 2: The Rule Allu Arjun And Fahadh Faasil New Faceoff Poster Release