हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 10:30 IST2024-04-06T10:29:21+5:302024-04-06T10:30:27+5:30

हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनचा काळजात धडकी भरवणारा थरारक लूक समोर

pushpa 2 new poster allu arjun rashmika mandanna fahad fazil | हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

'पुष्पा २' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पाच्या भूमिकेत थिएटर गाजवणार यात शंका नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून 'पुष्पा २' सिनेमाबद्दल विविध अपडेट्स समोर येत आहेत. कालच 'पुष्पा २' मधील रश्मिका मंदानाची भूमिका असलेला श्रीवल्लीचा लूक रिव्हिल करण्यात आला. अशातच काल रात्री उशीरा अल्लू अर्जुनने 'पुष्पा २' मधील नवीन पोस्टर लॉंच केलंय.

'पुष्पा २' चं नवीन पोस्टर पाहिल्यास दिसून येईल की, अल्लू अर्जुनचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. अल्लू शंख फुंकत असून त्याच्या हातात त्रिशूळ आहे. याशिवाय गुलालाने त्याचा चेहरा लाल दिसत आहे. अल्लूच्या डोळ्यात आग दिसतेय. अल्लूचा पुष्पाच्या भूमिकेतील हा थरारक पोस्टर काळजात धडकी भरवणारा आहे. ३ दिवसात 'पुष्पा २' चा ट्रेलर भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने हे खास पोस्टर लॉंच करण्यात आलंय. 

'पुष्पा २' बद्दल सांगायचं तर २०२१ साली आलेल्या गाजलेल्या 'पुष्पा' सिनेमाचा हा सीक्वेल आहे.  अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फाझिल या कलाकारांच्या दमदार अभिनयाने 'पुष्पा' चांगलाच गाजला. आता 'पुष्पा २' मध्ये हेच कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. गेल्याा वर्षी 'पुष्पा २' चा टिझर भेटीला आलेला. त्यात अल्लू अर्जुन फरार असून तो जंगलात सापडल्याचं दिसलं. आता 'पुष्पा २' च्या ट्रेलरमधून अजून काही गोष्टी स्पष्ट होतील.

Web Title: pushpa 2 new poster allu arjun rashmika mandanna fahad fazil