Pushpa 2: "या सिनेमाने माझ्या करिअरमध्ये खास काही केलं नाही"; 'पुष्पा 2' फेम फहाद फासिलची प्रामाणिक कबूली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:56 IST2024-12-06T14:55:04+5:302024-12-06T14:56:56+5:30

'पुष्पा 2'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने रोखठोक आणि प्रामाणिक कबूली केलीय. काय म्हणाला बघा (pushpa 2, fahad faasil)

Pushpa 2 fahad faasil talk about how pushpa movie help his career or not | Pushpa 2: "या सिनेमाने माझ्या करिअरमध्ये खास काही केलं नाही"; 'पुष्पा 2' फेम फहाद फासिलची प्रामाणिक कबूली

Pushpa 2: "या सिनेमाने माझ्या करिअरमध्ये खास काही केलं नाही"; 'पुष्पा 2' फेम फहाद फासिलची प्रामाणिक कबूली

'पुष्पा 2' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासूनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून 'पुष्पा 2' ची चर्चा आहे. 'पुष्पा 2' रिलीज होताच प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी हाउसफुल्ल गर्दी केलेली दिसली. या सिनेमातील प्रमुख कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची चांगलीच चर्चा होतेय. पण या दोघांसोबत चर्चा आहे ती म्हणजे भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारणारा अभिनेता फहाद फासिलची. फहादने मात्र एका मुलाखतीत 'पुष्पा' सिनेमामुळे त्याच्या करिअरमध्ये खास काही घडलं नाही, असं सांगितलं होतं.

'पुष्पा'विषयी फहाद काय म्हणाला होता?

एका मुलाखतीत फहादने हे वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, "मला नाही वाटत पुष्पाने माझ्यासाठी काही खास गोष्ट केलीय. मी हे दिग्दर्शक सुकुमार सरांनाही सांगितलंय. मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं. मी फक्त इथे माझं काम केलं. मला कोणाचाही अनादर करायचा नाही. पुष्पानंतर मी काहीतरी जादू करेल अशी लोकांची अपेक्षा नसावी. हा फक्त एक सहयोग होता आणि सुकुमार सरांबद्दलचं प्रेम होतं. माझा कंटेंट इथे आहे (मल्याळम). स्पष्टपणे सांगायचं तर, माझा कंटेंट इथे आहे."

फहाद फासिलच्या साकारलेल्या भूमिकेचं कौतुक

'पुष्पा' सिनेमात शेवटच्या अर्ध्या तासात फहाद फासिलची एन्ट्री झाली. फहादने त्याच्या अभिनयाने एक तगडा खलनायक साकारला. आता 'पुष्पा 2' निमित्ताने फहाद पुन्हा एकदा भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत झळकतोय. पुष्पा आणि भंवरची कॉँटे की टक्कर बघायला मिळतेय. दरम्यान बॉक्स ऑफिस रिपोर्टकडे नजर टाकल्यास 'पुष्पा 2'ने ओपनिंग डेला तब्बल १६५ कोटींची कमाई केलीय. हा सिनेमा येत्या महिन्याभरात बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Pushpa 2 fahad faasil talk about how pushpa movie help his career or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.