Pushpa 2: झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं, ४ दिवसांतच ५०० कोटी पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:09 IST2024-12-09T09:09:21+5:302024-12-09T09:09:49+5:30
'पुष्पा २' प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.

Pushpa 2: झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं, ४ दिवसांतच ५०० कोटी पार
Pushpa 2 : अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंगमधूनच प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे थिएटरमध्ये आल्यानंतर 'पुष्पा २'चे शोज
ठिकठिकाणी हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. रिलीज होताच 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'पुष्पा २' प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.
'पुष्पा २'ने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 'पुष्पा २'ची कमाई घटली. पण, पहिल्या वीकेंडला सिनेमाने पुन्हा भरारी घेत दमदार कमाई केली आहे. शनिवारी 'पुष्पा २'ने ११९.२५ कोटी कमावले. तर रविवारी १४१.५ कोटींचा गल्ला जमवला. अवघ्या चार दिवसांत 'पुष्पा २'ने देशात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाला आत्तापर्यंत ५२९.४५ कोटींचा गल्ला जमवण्यात यश आलं आहे.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'पुष्पा २ : द रुल'नंतर या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणादेखील करण्यात आली आहे. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फाहद फासिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. सुकुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.