'जवान'चा दिग्दर्श अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला पत्नीची खास पोस्ट, गोड फॅमिली फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 19:46 IST2023-09-21T19:43:11+5:302023-09-21T19:46:19+5:30

अ‍ॅटली कुमारचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. आज तो 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Priya birthday note for her husband Atlee | 'जवान'चा दिग्दर्श अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला पत्नीची खास पोस्ट, गोड फॅमिली फोटो केला शेअर

Priya - Atlee

'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार हा साऊथमध्ये तर लोकप्रिय होताच पण आता शाहरुख खानच्या चित्रपटामुळे त्याला देशभर प्रसिद्धी मिळाली आहे. आजवर अ‍ॅटली कुमारचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. आज तो 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रेटींनी आणि चाहत्यांनी अ‍ॅटलीला वाढदिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

 अ‍ॅटलीची पत्नी प्रिया मोहननेही खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. तर किंग खान शाहरुखनेही अ‍ॅटलीचा वाढदिवस खास केलाय. किंग खानने जवान चित्रपटातील लेटेस्ट गाण्याचा व्हिडीओही रिलीज केला आहे.


प्रियाने एक गोड फॅमिली फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये तिनं लिहलं की, "मीराकडून बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तु जसा आहेस त्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्यावर खुप प्रेम आहे. माझं जीवन इतकं सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद. माझं तुझ्यावर आणि मिनी यू (MEER) वर खूप प्रेम आहे".  

अ‍ॅटलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शाहरुख खानने अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटातील 'फर्राटा' हे गाणे रिलीज केले. अ‍ॅटली कुमारने 2013 मध्ये त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि केवळ चारच चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर त्याने शाहरुख सोबत 'जवान' हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. 'जवान'नंतर त्यांचं नाव देशभरात पोहोचलं असून केवळ तमीळच नाही, तर भारतीय चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून आता त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे.

Web Title: Priya birthday note for her husband Atlee