प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:06 IST2025-02-26T17:06:14+5:302025-02-26T17:06:31+5:30

बाप-लेकाच्या डान्सनं धुराळा उडवून दिलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar Deva At Dance Concert | प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

 Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar: फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'बाप बेटा' जोडीचा ट्रेंड आता रुजू झाला आहे. यात आणखीन एका जोडीची भर पडलीय. मुळात ही जोडी आहे प्रभु देवा (Prabhu Deva) आणि त्याचा लेक ऋषी राघवेन्द्र (Rishii Ragvendar Deva ) यांची. प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhu Deva) यास भारताचा मायकल जॅक्सन नावाने ओळखलं जातं. आपल्या दमदार नृत्यशैलीमुळे प्रभुदेवाने देशासह विदेशातही लोकप्रियता मिळवली आहे.  तर त्याचा मुलगा ऋषी राघवेन्द्रनेदेखील  आपल्या वडिलांप्रमाणेच डान्समध्ये महारथ मिळवली आहे.

आपल्या वडिलांचे काम जवळून न्याहाळणाऱ्या ऋषी राघवेन्द्रला लहानपणासूनच नृत्याचे वेड लागले. आता तो हुबेहुब प्रभुदेवासारखा डान्स करतो. नुकतंच एका कार्यक्रमात प्रभु देवा आणि ऋषी राघवेन्द्र यांनी एकत्र डान्स केलाय. कार्यक्रमात बाप-लेकाच्या डान्सनं धुराळा उडवून दिला. प्रभु देवानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "मला माझा मुलगा ऋषी राघवेन्द्रची तुमच्याशी ओळख करुन देताना मला अभिमान आहे. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र स्पॉटलाइट घेतली. हे डान्सपेक्षा खूप जास्त आहे. हा एक वारसा, एक आवड आणि एक प्रवास आहे जो नुकताच सुरू झालाय". 


या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. एकानं लिहलं, "जसा बाप, तसा मुलगा". तर आणखी एकाने लिहलं, "प्रभूदेवा कायम विनम्र आणि जमिनीशी जोडलेल्या लोकांपैकी एक आहे. तो स्टेजवर देखील त्याच्या मुलाला सगळ्यांचे आभार मानन्यास सांगतान दिसतोय. उत्तम परफॉर्मन्स". तर काही नेटकऱ्यांनी हार्ड एमोजी शेअर करत प्रभूदेवाच्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. नृत्यदिग्दर्शक असण्यासोबतच एक उत्तम अभिनेता सुद्धा आहे. प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपटात काम केले केले. यासोबतचं प्रभूदेवानं दिग्दर्शन क्षेत्रात देखील काम केलं आहे. प्रभू देवानं अनेक हिट गाण्यांची कोरियोग्राफी केली आहे आणि त्याला त्यासाठी दोन नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले आहे. 

Web Title: Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar Deva At Dance Concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.