'बाहुबली' प्रभास करणार लग्न? ट्विट व्हायरल, काय म्हणाला राम चरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:45 IST2025-01-12T13:44:50+5:302025-01-12T13:45:41+5:30

प्रभास बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Prabhas To Get Married Soon With Anushka Shetty? Trade Analyst's Twee And Ram Charan’s Cryptic Words Sparks Excitement | 'बाहुबली' प्रभास करणार लग्न? ट्विट व्हायरल, काय म्हणाला राम चरण?

'बाहुबली' प्रभास करणार लग्न? ट्विट व्हायरल, काय म्हणाला राम चरण?

Prabhas: चित्रपटसृष्टीतील 'बाहुबली' म्हणजेच प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रभास लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर येत आहे. ४५ वर्षीय प्रभासची होणारी पत्नी कोण असणार यासंदर्भातही चर्चांना उधाण आलं आहे.

अलीकडेच व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या x(ट्विटर) हँडलवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सुपरस्टार 'प्रभास' चे नाव लिहिले आहे. यासोबतच त्याचे लग्न आणि ब्राईडचा इमोजी शेअर केला आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रभासचं अभिनंदन केलंय. तर काही नेटकऱ्यांनी प्रभास हा अभिनेत्री अनुष्कासोबत ( Anushka Shetty) लग्न करत आहे का? असे प्रश्न केले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, खरं काय आहे ते लवकरच स्पष्ट होईल. 

प्रभास लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी राम चरणने (Ram Charan)दिले होते. greatandhra च्या रिपोर्टनुसार राम चरण 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी Unstoppable with NBK Season 4 आला होता. यावेळी बोलताना त्यानं प्रभास हा आंध्र प्रदेशातील मुलीशी लग्न करणार असल्याचा खुलासा केला. दरम्यान, या कार्यक्रमाचा हा एपिसोड १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होईल. त्यानंतर संपूर्ण माहिती उघड होईल.

प्रभासच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रभासच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक वेळा अफवा पाहायला मिळतात. एका मुलाखतीत प्रभासने त्याच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली होती. प्रभास त्यावेळी म्हणाला की, 'मी लवकर लग्न करणार नाही, कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत. प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. 

त्याच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मीडिया कार्यक्रमात, प्रभासने या अटकळीवर थेट भाष्य केले. अभिनेत्याने पुष्टी केली की सध्या लग्नाचा विचार त्याच्या मनात नाही. त्याने लग्न न करण्याचे कारणही सांगितले कारण त्यामुळे त्याचा मोठा महिला चाहता वर्ग नाराज होऊ शकतो. तो म्हणाला होता, "मी लवकरच लग्न करत नाहीये कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत". दरम्यान,  त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'द राजा साब', 'सालार पार्ट २' आणि 'कन्नप्पा '(कॅमियो भूमिका) मध्ये पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Prabhas To Get Married Soon With Anushka Shetty? Trade Analyst's Twee And Ram Charan’s Cryptic Words Sparks Excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.