पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:44 IST2025-09-17T13:43:49+5:302025-09-17T13:44:50+5:30

Prime Minister Narendra Modi Biopic Announcement : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १७ सप्टेंबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.

PM Narendra Modi Turns 75 Indian Prime Minister Narendra Modi Biopic Maa Vande Unveiled With Unni Mukundan | पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

PM Modi Biopic Maa Vande: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे देशातील लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. आज, १७ सप्टेंबर रोजी ते ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहे. या खास प्रसंगी, दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडून पंतप्रधान मोदींना एक मोठे सरप्राइज मिळाले आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि 'मारको' सिनेमा फेम उन्नी मुकुंदन (Unni Mukundan)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'मां वंदे' (Maa Vande) या चित्रपटाची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच त्यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 'मां वंदे' चित्रपटाचे पहिले पोस्टरही समोर आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता उन्नी मुकुंदनने इंस्टाग्राम अकाउंटवर 'मां वंदे' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात पंतप्रधान मोदींच्या जीवनसंघर्षाची आणि यशाची कथा सविस्तर दाखवली जाणार आहे. 'मां वंदे' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत उन्नी मुकुंदनची थोडीशी झलक दिसत आहे.

उन्नी मुकुंदनने पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मल्याळम सुपरस्टारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझा पुढील चित्रपट 'मां वंदे'मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांची भूमिका साकारत असल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्ती कुमार करणार आहेत.


त्याने पुढे म्हटलं की, माझं बालपण अहमदाबादमध्ये गेलं आणि मी त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून पाहिले होते. वर्षभरानंतर, एप्रिल २०२३ मध्ये, मला त्यांची वैयक्तिक भेट घेण्याचं सौभाग्य मिळालं, तो क्षण माझ्या मनात कायम कोरला गेला आहे. एक अभिनेता म्हणून त्यांची भूमिका पडद्यावर साकारणं माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. 'मां वंदे' हा चित्रपट वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेत प्रदर्शित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या भेटीतील दोन शब्द मला अजूनही आठवतात, 'झुकवानु नही', म्हणजे कधीही वाकायचं नाही."
 

Web Title: PM Narendra Modi Turns 75 Indian Prime Minister Narendra Modi Biopic Maa Vande Unveiled With Unni Mukundan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.