OTT वर येताच 'या' चित्रपटाची धमाल; IMDb वर ७.९ रेटिंग, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:29 IST2025-08-14T11:24:41+5:302025-08-14T11:29:55+5:30
Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा ड्रामा

OTT वर येताच 'या' चित्रपटाची धमाल; IMDb वर ७.९ रेटिंग, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे
ओटीटीवर दर आठवड्याला अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होतात. पण त्यापैकी काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवतात. असाच एक चित्रपट म्हणजे तमिळ रोड म्युझिकल कॉमेडी 'परंथु पो' हा आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अतिशय कमी खर्चात बनलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याची दमदार कहाणी लोकांच्या मनाला भिडली आहे.
'परंथु पो' हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच याने इतर सर्व नवीन प्रदर्शित चित्रपटांना मागे टाकत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या आठवड्यात हा सर्वाधिक पाहिलेला दक्षिण भारतीय चित्रपट ठरला असून तो २२ लाख वेळा पाहिला गेला आहे. आयएमडीबीवरही या चित्रपटाला ७.९ रेटिंग मिळाले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि सह-निर्मिती राम यांनी केली आहे. चित्रपटात ८ वर्षांच्या हट्टी मुलाची भूमिका मिथुल रायन यांनी साकारली आहे. तर मुलाच्या पालकांची भूमिका शिवा (गोकुळ) आणि ग्रेस अँटनी (अंजली) यांनी साकारली आहे. याशिवाय विजय येसुदास आणि अजू वर्गीस देखील मुख्य भूमिकेत आहेत.
बॉक्स ऑफिसपेक्षा ओटीटीवर लोकप्रियता
'परंथु पो' थिएटरमध्ये फारसा बॉक्स ऑफिस यश मिळवू शकला नाही. मात्र ओटीटीवर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर घर केले. जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाने तेलुगूच्या 'थम्मुडू', तमिळच्या '३बीएचके', मल्याळमच्या 'नादिकर' यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळालं नसलं तरी, ओटीटीवर हा चित्रपट प्रेक्षकांचा मनपसंत ठरला आहे. जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे.