'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:05 IST2025-12-23T09:04:40+5:302025-12-23T09:05:45+5:30
सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटापेक्षा सध्या भारतात फ्लॉप ठरलेला चित्रपट पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर वनवर ट्रेंड करतो आहे.

'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा
सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रणवीरसोबतच अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही, तिथल्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. मात्र या चित्रपटापेक्षा सध्या भारतात फ्लॉप ठरलेला चित्रपट पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर वनवर ट्रेंड करतो आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या 'द गर्लफ्रेंड' या तेलुगु चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखवण्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर या चित्रपटाला 'फ्लॉप' घोषित करण्यात आले. मात्र, भारतात सुपरफ्लॉप ठरलेला हा चित्रपट आता पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील झाला असून तिथले प्रेक्षक तो आवडीने पाहत आहेत. नुकताच नेटफ्लिक्सने आपला अधिकृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या नेटफ्लिक्स टॉप १० लिस्टमध्ये भारतीय चित्रपट 'द गर्लफ्रेंड'ने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. भारतात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तो फ्लॉप ठरला. पण आता रश्मिका मंदानाचा हा तेलुगु चित्रपट केवळ भारताच्याच नव्हे, तर पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवरही ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले.
'द गर्लफ्रेंड'ची कथा आणि स्टारकास्ट
रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला 'द गर्लफ्रेंड' हा एक सायकॉलॉजिकल रोमँटिक चित्रपट आहे. यामध्ये रश्मिका एका कॉलेज स्टुडंटची भूमिका साकारत आहे, जिला तिच्या क्लासमेटसोबत प्रेम होते. सुरुवातीला ही कथा साधी आणि गोड वाटते, पण जसा चित्रपट पुढे जातो तसा त्यातील सस्पेन्स वाढत जातो. हळूहळू या तरुणीचा बॉयफ्रेंड अतिशय 'कंट्रोलिंग' होऊ लागतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यात विषारीपणा वाढू लागतो. या चित्रपटात टॉक्सिक रिलेशनशिप आणि मॅनिप्युलेशनची कथा अतिशय संवेदनशीलतेने मांडण्यात आली आहे. चित्रपट फ्लॉप झाला असला तरी, रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. रश्मिकासोबतच अनु इमॅन्युएल, राव रमेश, रोहिणी आणि दीक्षित शेट्टी यांसारख्या कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
'द गर्लफ्रेंड'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
रश्मिका मंदानाचा हा सायकॉलॉजिकल चित्रपट ७ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १.३ कोटींची कमाई केली, तर एका आठवड्यानंतर चित्रपटाने ११.३ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने एकूण ६ कोटी रुपये कमावले. 'द गर्लफ्रेंड'च्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बॉक्स ऑफिसवर याची कमाई १७.५ कोटी रुपये राहिली, तर जगभरात या चित्रपटाने २७.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.