"कोणीच सांगितलं नाही...", ३० वर्षांनंतर खरं प्रेम मिळाल्यावर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची हृदयस्पर्शी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:22 IST2025-09-29T12:15:02+5:302025-09-29T12:22:10+5:30
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीस वर्षांची महिला असण्याबद्दलचे अनेक विचार व्यक्त केले. तिचे तीस आणि विशीतील आयुष्य किती वेगळे आहे हे तिने सांगितले. तसेच, तिला 'खरे प्रेम' मिळाल्याबद्दलही तिने भाष्य केले.

"कोणीच सांगितलं नाही...", ३० वर्षांनंतर खरं प्रेम मिळाल्यावर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची हृदयस्पर्शी पोस्ट
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर नेहमीच तिचे आयुष्य, आगामी प्रोजेक्ट आणि जाहिरातींशी संबंधित माहिती शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीस वर्षांची महिला असण्याबद्दलचे अनेक विचार व्यक्त केले. तिचे तीस आणि विशीतील आयुष्य किती वेगळे आहे हे तिने सांगितले. तसेच, तिला 'खरे प्रेम' मिळाल्याबद्दलही तिने भाष्य केले.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप छान दिसत आहे. समंथाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मी आणि अवनी रांभिया काल बोलत होतो आणि त्यामुळे मला एक गोष्ट विचार करायला भाग पाडली की..." यासह तिने एक खूप मोठी कविता शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या विशीच्या वयाची तुलना तिशीच्या वयाशी केली आहे. समंथाने सांगितले की,''जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे प्रत्येकजण तुम्हाला पुढे काय होईल हे सांगण्याचा प्रयत्न करतो. 'तुमचा ग्लो (तेज) कमी होईल, सौंदर्य कमी होईल,' असे लोक सांगतात. पण, खरं प्रेम काय असतो हे कोणीच सांगितले नाही. ते मला जशी मी आहे तशीच शोधून काढेल. मला स्वतःला बदलावं लागणार नाही.''
नागा चैतन्यसोबत झालेलं पहिलं लग्न
समंथा रुथ प्रभूचे पहिले लग्न अभिनेता नागा चैतन्य याच्याशी झाले होते. दोघांनी २०१५ मध्ये डेटिंगला सुरुवात केली. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोव्यात त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी हिंदू पद्धतीने विवाह केला. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली आणि त्याच्या पुढील वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर नागा चैतन्यने ४ डिसेंबर २०२४ रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये शोभिता हिच्याशी लग्न केले. तर, समंथा सध्या राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा आहे.
समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल
समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या राज आणि डीके यांच्यासोबत 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' या सीरिजवर काम करत आहे. या सीरिजमध्ये समांथासोबत आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.