नागा चैतन्य आणि शोभिताला 'ही' कोट्यवधीची भेटवस्तू देणार नागार्जुन, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:59 IST2024-12-01T09:58:06+5:302024-12-01T09:59:38+5:30

नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे.

Nagarjuna Akkineni Buy New Luxury Car For Naga Chaitanya And Sobhita Dhulipala As Wedding Gift | नागा चैतन्य आणि शोभिताला 'ही' कोट्यवधीची भेटवस्तू देणार नागार्जुन, Video Viral

नागा चैतन्य आणि शोभिताला 'ही' कोट्यवधीची भेटवस्तू देणार नागार्जुन, Video Viral

अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) या  कपलच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.  त्या दोघांच्या लग्नाच्या विधिंना सुरूवात झाली आहे. नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. नागा चैतन्य हा शोभिता धुलिपालासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधतो आहे. त्याने याआधी समांथा रुथ प्रभूशी प्रेमविवाह केला होता. मात्र, चारच वर्षात त्यांच्या घटस्फोट झाला. आता नागा शोभितासोबत दुसरं लग्न करणार आहे. आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नात नागार्जुन आनंदी आहे. तो या नव्या जोडीला खास कोट्यवधींची भेटवस्तू देणार आहे. 

नागार्जुन 'लेक्सस एलएम एमपीवी' ही महागडी कार नागा चैतन्य आणि शोभिताला लग्नाचं गिफ्ट म्हणून देणार आहे.   मरून रंगाच्या कारची खरेदी त्याने नुकतंच केली. या कारच्या नोंदणीसाठी नागार्जुन हैदराबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये पोहचला होता. त्यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हायब्रिड-इलेक्ट्रिक असलेल्या या गाडीची किंमत तब्बल  २.५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये सात फेरे घेणार आहेत. हा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने हा पार पडणार आहे.  विशेष म्हणजे तब्बल ८ तास लग्नाचे विधी चालणार असल्याची माहिती आहे. आपल्या खास दिवशी शोभिता सोन्याचं वर्क असलेली कांजीवरम साडी नेसणार आहे. गेल्या ऑगस्टमध्ये दोघांचा कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थित साखरपूडा पार पडला होता. नागा चैतन्य आणि शोभिता हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

Web Title: Nagarjuna Akkineni Buy New Luxury Car For Naga Chaitanya And Sobhita Dhulipala As Wedding Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.