नागा चैतन्यच्या लग्नापूर्वीच छोट्या भावाने दिली गुड न्यूज; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:14 IST2024-11-27T09:11:34+5:302024-11-27T09:14:58+5:30

साऊथस्टार अभिनेता नागार्जुन यांच्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

naga chaitanya younger brother actor akhil akkineni engagement to zainab ravdjee shared photo on social media | नागा चैतन्यच्या लग्नापूर्वीच छोट्या भावाने दिली गुड न्यूज; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

नागा चैतन्यच्या लग्नापूर्वीच छोट्या भावाने दिली गुड न्यूज; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

Akhil Akkineni: साऊथस्टार अभिनेता नागार्जुन यांच्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. लवकरच अभिनेत्याच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. नागार्जुन यांचा मोठा थोरला मुलगा म्हणजेच नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलीपालासोबत  ( Sobhita Dhulipala ) येत्या काही दिवसांत लग्न करणार आहे. येत्या ४ डिसेंबरला ते लग्नबंधनात अडकतील. त्यातच आता अक्किनेनी कुटुंबातून दुसरी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागा चैत्यन्यच्या लग्नापूर्वीच त्याचा छोटा भाऊ अखिल अक्किनेनीने नुकताच साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. 


अखिल अक्किनेनीने वयाच्या ३० व्या वर्षी त्याची गर्लफ्रेंड झैनब रावदजीसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेता नागार्जुन यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या लेकाच्या एंगेजमेंटमधील खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अशातच अखिलने देखील सोशल मीडिया हॅंडलवरून त्याचे आणि झैनबचे फोटो शेअर करत त्यांनी एक नवी सुरूवात करत असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

अखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. "माझा आणि झैनब रावदजीचा साखरपुडा झाला आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे,” असं कॅप्शन अखिलने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंमध्ये हे त्यांनी पांढऱ्या रंगाचं ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. झैनब पांढऱ्या कॅज्यूअल ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे, तर अखिलनेही पांढरी पँट आणि शर्ट परिधान केला आहे. 

दरम्यान, अखिल अक्किनेनीने २०१६ मध्ये श्रिया भुपलशी साखरपुडा केला होता. मात्र लग्न होण्याआधीच त्यांचं नातं तुटलं. परंतु आता जवळपास ८ वर्षांनी अखिलने त्याची गर्लफ्रेंड झैनबशी साखरपुडा केला आहे.

Web Title: naga chaitanya younger brother actor akhil akkineni engagement to zainab ravdjee shared photo on social media